For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिण सोलापुरात महापूर; मुगळेंची तत्पर मदत!

04:11 PM Sep 23, 2025 IST | Radhika Patil
दक्षिण सोलापुरात महापूर  मुगळेंची तत्पर मदत
Advertisement

पूरग्रस्त नागरिकांसाठी मंद्रूपमध्ये निवारा व अन्नाची व्यवस्था; गावोगावी फिरून मदतकार्य सुरू

मंद्रूप / अभिजित जवळकोटे :

Advertisement

सीना कोळेगाव प्रकल्पातून सुमारे 2 लाख घनमीटर पाणी सोडल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी, मनगुळी, नंदूर, गुंजेगाव, अकोले मंद्रूप, वडकबाळ यांसारख्या गावांना भीषण पूरस्थितीचा सामना करावा लागला आहे.
या पूरामुळे गावांचा संपर्क तुटला आहे, वीजपुरवठा खंडित झाला असून मोबाईल टॉवर्स बंद झाल्याने नागरिक एकमेकांशी संपर्क साधू शकत नाहीत. अनेकजण अजूनही गावात अडकलेले आहेत.

  • मळसिद्ध मुगळे यांचे तत्पर मदतकार्य

या संकटाच्या घडीला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि उद्योजक मळसिद्ध मुगळे यांनी घेतलेली साहसशील आणि मानवतावादी पुढाकार अतिशय कौतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरतो आहे.

Advertisement

  • पूरग्रस्त नागरिकांना मंद्रूप येथील श्री विष्णुपंत देशपांडे इंग्लिश मीडियम शाळेत स्थलांतरित करून रात्रभर जेवण व निवासाची व्यवस्था करण्यात आली.

  • आजही ते गावोगावी स्वतः फिरून मदतकार्य करत आहेत, गरजू नागरिकांना अन्न, औषधे व निवारा देण्याचे काम सुरू आहे.

  • त्यांच्या सहकाऱ्यांनीही सक्रिय सहभाग देऊन नागरिकांना महापुराच्या भीतीतून दिलासा दिला आहे.

मळसिद्ध मुगळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, "पुढील 2–3 दिवस पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ज्यांना अन्न, निवारा किंवा औषधांची गरज आहे त्यांनी निःसंकोचपणे आमच्याशी संपर्क साधावा."

या नैसर्गिक आपत्तीत अनेक राजकीय नेत्यांनी पाठ फिरवली असताना, मळसिद्ध मुगळे हे खरे भूमीपुत्र ठरले आहेत. त्यांच्या सहृदयतेचा आणि तत्परतेचा आदर्श समाजासमोर उभा राहिला आहे.

महापुराच्या काळात राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणारा नेता म्हणजे मळसिद्ध मुगळे. संकटात त्यांनी दाखवलेले धैर्य, संवेदनशीलता आणि कृती ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

Advertisement
Tags :

.