डेकोरेशनसाठी जाणाऱ्या पाच कामगारांवर काळची झडप
उडुपी जिल्ह्यातील घटना सर्व मृत उत्तर भारतातील
बेंगळूर : डेकोरेशनच्या साहित्याची वाहतूक करणारा टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. या अपघातात पाच कामगार ठार झाले. रविवारी दुपारी उडुपी जिल्ह्याच्या कापू तालुक्यातील कोतलकट्टे येथे ही दुर्घटना घडली. एका कार्यक्रमासाठी डेकोरेशनचे साहित्य भरलेला टेम्पो कापू तालुक्यातील मुजुरी येथून माल्पेला निघाला होता. यावेळी महामार्गावर टेम्पोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो दुभाजकाला धडकून सर्व्हिस रोडवर जाऊन उलटली. टेम्पोत 12 कामगार होते. यापैकी दोघेजण जागीच ठार झाले तर तिघांचा इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये पश्चिम बंगालमधील कमल, समरेश, आसाममधील रवी दास, हरिश, त्रिपुरामधील गोपीनाथ यांचा समावेश आहे. 7 जखमी कामगारांना कापू येथील विविध इस्पितळांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गणेश बहादूर रॉय, प्रभास रॉय, गोपाल भौमिक, रणजित अमीन, सुब्रितो, सूरज धोलाई अशी जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कापू पोलिसांनी धाव घेतली.