कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंडियन कराटे क्लबच्या पाच विद्यार्थ्यांना ब्लॅकबेल्ट

06:03 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

येथील ब्रम्हदेव समुदाय भवन मजगाव बेळगाव येथे कराटेची बेल्ट परीक्षा पार पडली. या परीक्षेत एकूण  145 कलर बेल्ट कराटेपटू सहभागी झाले होते.

Advertisement

टॉप पाच ब्लॅकबेल्ट विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे:-मारूती नावगेकर, विराज लाड, चैतन्य कडकोळ, आदित्य कडकोळ आणि चिरंजीत प्रधान या  विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी पदके मिळविली.

जीवन ज्योती इंग्लिश मिडीयम शाळेचे उपप्राचार्य हैदर अली, सेंट जर्मन्स शाळेचे चेअरमन उदय इडगल, सुनिता देसाई, गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते ब्लॅकबेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या पालकांना सुद्धा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. वरील पाच ब्लॅकबेल्ट विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक विठ्ठल भोजगार आणि दीपिका भोजगार यांचे प्रशिक्षण लाभत आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इंस्ट्रक्टर हेमलता ग. काकतीकर व प्रशिक्षक प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, निलेश गुरखा, हरिष सोनार, परशराम नेकार, जयकुमार मिश्रा, सक्षम हंडे, आणि वचना देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article