For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयास पंचतारांकित मानांकन

01:03 PM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयास पंचतारांकित मानांकन
Advertisement

गोवा बोर्डाचा उपक्रम, गेल्यावर्षी हायस्कूल विभागास,पालकांत समाधान

Advertisement

हरमल : गोवा माध्य.शिक्षण मंडळाच्या ग्रेडेशन उपक्रमांतर्गत यंदा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या हायर सेकंडरी विभागास पंचतारांकित मानांकन बहाल केल्याचे हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या ग्रेडेशनांतर्गत पायाभूत सुविधा, निकाल, विद्यालयीन प्रवेश, ऑफिस, वर्ग, विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धात सहभाग, मैदान, वर्गातील शिकवणी, वर्ग अशा निकषांचा समावेश असतो व प्रत्येक संस्थेचे मूल्यमापन केले जाते. गेल्यावर्षी गोव्यातील पाच-सहा संस्थांमधून हरमल पंचक्रोशी हायस्कूलला पंचतारांकित दर्जा मिळाला. शैक्षणिक संस्थेने योग्य काम केल्यास, शिक्षण खाते व सरकार त्याची दखल घेत असल्यास व्यवस्थापकांना निश्चितच हुरूप येतो. त्याहीपेक्षा ज्या संस्था टू स्टार,थ्री स्टारनाजिक आहेत त्यांना फाईव्ह स्टार प्राप्त करण्याचे बळ मिळते व त्यांचे प्रयत्न सुरू होतात.

पेडणे तालुक्यातील सुमारे 36 शाळांमधून गेल्यावर्षी तर यंदा तालुक्यातील 5 हायर सेकंडरीमधून ‘फाईव्ह स्टार’ मानांकन मिळाले याचा आनंद आहे. यंदा हायस्कूलात 550 पेक्षा जास्त व उच्च माध्यमिक विद्यालयात 750 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगितले. दरवर्षी पाचवी, आठवी व अकरावीत मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेतात, मात्र अलिकडे दुसऱ्या गावातील विद्यार्थी, पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत, दरवर्षी प्रत्येक वर्गात आठ-दहा विद्यार्थी प्रवेश घेत असल्याचे सांगितले. अलिकडे पालकही आपल्या पाल्यांना पंचक्रोशी शिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येते. प्रत्येक शाळांतील अनुभवी एक-दोन समजूतदार सदस्य व चार-पाच ज्येष्ठ शिक्षक मिळून आमच्या शाळेच्या कार्यपद्धतीचा अनुभव घ्यावा. त्यांनी सकाळी प्रार्थनेपासून ते शाळा सुटेपर्यंत पाहणी करून त्यातून त्यांना उचित गोष्टी समजून येतील.

Advertisement

Advertisement
Tags :

.