For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यूझीलंड संघात पाच फिरकी गोलंदाज

06:22 AM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
न्यूझीलंड संघात पाच फिरकी गोलंदाज
Advertisement

वृत्तसंस्था/ऑकलंड

Advertisement

पुढील महिन्यात न्यूझीलंडचा संघ अफगाणबरोबर एक कसोटी तर त्यानंतर लंकेबरोबर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी क्रिकेट न्यूझीलंडने घोषित केलेल्या न्यूझीलंड संघामध्ये पाच फिरकी गोलंदाजांचा समावेश केला आहे.

न्यूझीलंड आणि अफगाण यांच्यातील एकमेव कसोटी सामना 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान भारतातील ग्रेटर नोएडा येथे खेळविला जाणार आहे. या सामन्यानंतर न्यूझीलंडचा संघ लंकेला रवाना होईल. लंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत सदर मालिका असून ही मालिका 18 ते 26 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज टीम साऊदीकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. घोषित करण्यात आलेल्या न्यूझीलंड संघामध्ये केन विलियमसन, कॉन्वे, फिलीप्स, रचिन रवींद्र आणि लॅथम यांचा समावेश आहे. लॅथमकडे उपकर्णधारपद राहिल. या आगामी कसोटी मालिकेत खेळपट्ट्या फिरकीला अनकुल असल्याने न्यूझीलंडच्या निवड समितीने 5 फिरकी गोलंदाजांचा संघात समावेश केला आहे. न्यूझीलंड संघातील वेगवान गोलंदाज ओरुरकी आणि बेन सिरेस यांचे या मालिकेत कसोटी पदार्पण होत आहे. मिचेल ब्रेसवेलचे संघात पुनरागमन झाले आहे. सँटेनर, अझाज पटेल, फिलीप्स, रचिन रविंद्र आणि ब्रेसवेल हे न्यूझीलंड संघातील पाच फिरकी गोलंदाज आहेत.

Advertisement

न्यूझीलंड संघ: टीम साऊदी (कर्णधार), ब्लंडेल, ब्रेसवेल, कॉन्वे, हेनरी, लॅथम, मिचेल, ओरुरकी, अझाज पटेल, फिलीप्त, रचिन रविंद्र, सँटेनर, सिरेस, विलियमसन व यंग

न्यूझीलंड-अफगाण कसोटी सामना 9 ते 13 सप्टेंबर-ग्रेटर नोयडा

न्यूझीलंड-लंका पहिली कसोटी 18 ते 22 सप्टेंबर गॅले

न्यूझीलंड-लंका दुसरी कसोटी 26 ते 30 सप्टेंबर गॅले

Advertisement
Tags :

.