महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हार येथील चोरीप्रकरणी पाच जणांना अटक

10:41 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चोरांकडून 32 लाख 29 हजारांची रोकड जप्त : विजापूर पोलिसांच्या कारवाईचे कौतुक

Advertisement

वार्ताहर /विजापूर

Advertisement

संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या कोल्हार येथे एका लॉरी चालकावर हल्ला करून सुमारे 32 लाख 29 हजार 364 रुपये लांबविल्याची घटना घडली होती. त्याप्रकरणी विजापूर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली होती. त्याला यश आले असून या प्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली आहे. महांतेश शिवगोंडा तळवार, धरेश रेवणसिद्ध दळवाई, शिवाप्पा शरणप्पा मैश्याळ, सुनील रामाप्पा व•ार आणि शिवानंद दळवाई अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. त्यांच्याकडून 31 लाख 04 हजार 356 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती अशी, कोल्हार येथील एका लॉरी चालकावर प्राणघातक हल्ला व दरोडा टाकल्याची तक्रार नोंद झाली होती. त्याचा तपास गतिमान करण्यात आला. या चोरी प्रकरणात लॉरी चालक महांतेश शिवगोंडा तळवार याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर कारवाई एएसपी रमणगौडा हत्ती, शंकर मारिहाळ, डीवायएसपी बाळ्ळाप्पा नंदगावी, गिरीमल तळकट्टी आणि पोलीस अधिकारी शरणगौडा गौडा, प्रवीणकुमार गरबाळा, यतीशकुमार के. एन., आय. आर. मदार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article