For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हल्ल्याप्रकरणी पाच जणांना अटक

11:26 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
हल्ल्याप्रकरणी पाच जणांना अटक
Advertisement

फरारी आरोपींचा पोलिसांकडून शोध : गुंड प्रवृत्तीला आळा घाला

Advertisement

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला करणाऱ्या पाच जणांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील उर्वरित आरोपी फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. कार्यकर्त्याच्या घरावरील हल्ल्यानंतर म. ए. समितीने आक्रमक भूमिका घेत पोलीस स्थानकासमोर निदर्शने केली होती. शुभम महादेव पोटे (वय 24), श्रीराम ऊर्फ लोण्या महादेव पोटे (वय 25) दोघेही रा. कचेरी गल्ली, शहापूर, अजय महादेव सुगणे (वय 29) रा. रामदेव गल्ली, वडगाव, बाळकृष्ण ऊर्फ किशन मारुती मंडोळकर (वय 23) रा. हट्टीहोळ गल्ली, शहापूर, मंगेश ऊर्फ सोन्या यशवंत कित्तूर (वय 22) रा. आनंदवाडी, शहापूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शुभमला रविवारी तर उर्वरित चौघा जणांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. सर्व पाच जणांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. शहापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर तिगडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. शनिवार दि. 27 एप्रिल रोजी मध्यरात्री एका टोळक्याने लक्ष्मी रोड, भारतनगर, शहापूर येथील सचिन केळवेकर यांच्या घरावर हल्ला केला होता. चाकू, रॉडने हल्ला करत दगडफेकही करण्यात आली होती. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील चौघे जण जखमी झाले होते. सुंदर केळवेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

गुंड प्रवृत्तीवर आळा बसविण्याची मागणी

Advertisement

हल्ला प्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी रविवारी सकाळी म. ए. समितीच्या नेते-कार्यकर्त्यांनी शहापूर पोलीस स्थानकासमोर ठाण मांडले होते. तर सायंकाळी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या व समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीवर आळा बसविण्याची मागणी करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.