For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोणावळ्यात धबधब्यातून पाचजण वाहून गेले

06:37 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोणावळ्यात धबधब्यातून  पाचजण वाहून गेले
Advertisement

► लोणावळा  /  प्रतिनिधी

Advertisement

भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या प्रवाहातून 4 अल्पवयीन मुले व महिला पर्यटक धरणात वाहून गेले असून, यापैकी एक महिला व दोन मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश आले आहे. रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

नूर शाहिस्ता अन्सारी (वय अंदाजे 35), अमिना आदिल अन्सारी (वय 13), मारिया अन्सारी (वय 7), हुमेदा अन्सारी (वय 6), अदनान अन्सारी (वय 4) (सर्वजण राहणार सय्यदनगर, हडपसर, पुणे) हे पाच जण पाण्यात वाहून गेले आहेत. यापैकी नूर शहीस्ता अन्सारी व अमिणा आदिल अन्सारी, मारिया अन्सारी या तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.

Advertisement

लोणावळा परिसरात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होऊन धरणात येत असल्याने दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास धरणदेखील ओव्हर फ्लो झाले आहे. सकाळच्या सत्रात धरण परिसरात पर्यटनासाठी पुण्याच्या हडपसर भागातील अन्सारी कुटुंब आले होते. रेल्वे विश्र्रांती गृह असलेल्या भागात डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्याच्या पाण्यातून येणाऱ्या प्रवाहात साधारण: 15 ते 17 जण वर्षाविहाराचा आनंद घेत असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास यामधील 4 लहान मुले पाण्यात वाहून जाऊ लागली. त्यांना वाचविण्यासाठी गेलेली एक महिलादेखील पाण्यातून थेट धरणाच्या जलाशयात वाहून गेली. सर्व जण धरणात वाहून गेल्याने सोबतच्या इतरांनी त्यांना वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. त्यावेळी काही स्थानिक युवक व धरणावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेची माहिती समजताच लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह त्यांची टीम तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्मयू पथक, मावळ वन्य जीव रक्षक टीम व स्थानिक युवक यांनी घटनास्थळी जात शोधमोहीम सुरू केली. तिघांचे मृतदेह सापडले असून, इतरांचा शोध सुरू आहे.

Advertisement
Tags :

.