For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना ऑटोनगर परिसरातून अटक

11:12 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना ऑटोनगर परिसरातून अटक
Advertisement

माळमारुती पोलिसांची कारवाई : चाकू, लाठ्या, मिरची पावडर जप्त

Advertisement

बेळगाव : रविवारी पहाटे दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना माळमारुती पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून चाकू, लाठ्या, मिरची पावडर जप्त केली आहे. ऑटोनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी रात्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक होती. शहरातील बहुतेक अधिकारी मिरवणूक बंदोबस्तात होते. हीच संधी साधून या पाच जणांनी ऑटोनगर येथील आरटीओ ग्राऊंडजवळ दरोड्याच्या तयारीत बसले होते. यासंबंधीची माहिती मिळताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना अटक केली. रोहित शेषाप्पा कोंकणी (वय 20) रा. बसव कॉलनी, नियाजअहमद निसारअहमद शहापुरी (वय 30) रा. न्यू गांधीनगर, वैभव राजू कमते (वय 20) रा. बसव कॉलनी, गणेश शिवाप्पा कोळवी (वय 19) रा. कंग्राळी खुर्द, सुनील मारुती नायक (वय 27) रा. रुक्मिणीनगर अशी त्यांची नावे आहेत. रविवारी पहाटे 3.45 वाजण्याच्या सुमारास आरटीओ ग्राऊंडजवळ या पाच जणांना ताब्यात घेतले. सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.