महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सिलिंडर स्फोटामुळे पाच जणांचा मृत्यू

06:11 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
**EDS: SCREENSHOT VIA PTI VIDEO** Lucknow: Remains of damaged commodities after two LPG cylinders exploded in a house, in Lucknow, Wednesday, March 6, 2024. Five people were killed and four others suffered injuries, according to police. (PTI Photo)(PTI03_06_2024_000127B)
Advertisement

लखनौमधील दुर्घटना : 4 गंभीर : मृतांमध्ये पती-पत्नीसह 3 मुले

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

उत्तर प्रदेशात लखनौमधील काकोरी येथील हाता हजरत साहेब परिसरातील एका दुमजली इमारतीत मंगळवारी रात्री आग लागली. आग लागताच दोन सिलिंडरचा स्फोट झाला. या अपघातात दाम्पत्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन मुलांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तासात आग आटोक्मयात आणली. या भीषण अपघातात अन्य चार जण भाजले असून त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. चौघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.

मुशीर अली (50, रा. हाता हजरत साहेब) हे फटाक्मयाचा व्यवसाय करत होते. मंगळवारी रात्री 10.30 च्या सुमारास त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्यानंतर काही मिनिटांतच दोन सिलिंडरचाही मोठा स्फोट झाला. या स्फोटांमुळे घराचे छत उडाले आणि भिंतीही कोसळल्या. घरातील लोक बाहेर येईपर्यंत आग घरभर पसरली. मुशीर यांच्या खोलीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. मुशीर व इतर आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर आग नियंत्रणाबाहेर गेली आणि संपूर्ण घराला आग लागली. मुशीर, त्यांची पत्नी हुस्ना बानो (45) यांच्यास रैया (5), हिबा (2) आणि हुमा (3) या आगीत जिवंत जळाल्या. पोलीस आणि अग्निशमन दलाने बचावकार्य राबवत चौघांना वाचवले असले तरी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. अपघाताच्या वेळी घरात 20 हून अधिक लोक होते. सुदैवाने अन्य लोक वेळेत बाहेर पडल्यामुळे ते बचावले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article