For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सवलतीच्या दरात घरपट्टी भरण्यासाठी आणखी पाच दिवस शिल्लक

11:28 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
सवलतीच्या दरात घरपट्टी भरण्यासाठी आणखी पाच दिवस शिल्लक
Advertisement

मागील दंडाबाबत अद्याप कोणताच निर्णय नाही

Advertisement

बेळगाव : घरपट्टी भरण्यासाठी शहरातील जनतेला महानगरपालिकेकडून 14 सप्टेंबरपर्यंत 5 टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. आता केवळ 5 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे अनेकजण घरपट्टी भरण्यासाठी धडपड करीत आहेत. ऑनलाईन व चलन भरून ही घरपट्टी भरली जात आहे. अचानकपणे ही सवलत देण्यात आली. मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी दोन टक्के दंडासह रक्कम भरली आहे, त्याबाबत अजून कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये 5 टक्के सवलत दिली जाते. तसेच मे महिन्यामध्ये विनादंड रक्कम भरून घेतली जाते.

त्यानंतर जूनपासून दंडाच्या आकारणीला सुरुवात होते. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये लोकसभा निवडणूक व सर्व्हरडाऊनच्या समस्येमुळे घरपट्टी भरणे अशक्य झाले होते. त्याबाबत नगरविकास खात्याकडे सवलत वाढवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर जूनमध्ये सवलत देण्यात आली होती. मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये सवलत बंद करण्यात आली. ऑगस्टमध्ये तर दोन टक्के दंडासह रक्कम भरून घेण्यात आली. ऑगस्ट 29 पासून 14 सप्टेंबरपर्यंत पुन्हा 5 टक्के सवलत देण्याची जाहीर करण्यात आली.

Advertisement

त्यानंतर नागरिकांनीही घरपट्टी भरण्यास सुरुवात केली. या काळात भरलेल्या सर्वांना सवलतीचा फायदा मिळाला. मात्र मध्यंतरी दंडासह रक्कम भरलेल्या घर मालकांना फटका बसला आहे. त्याबाबत अद्याप कोणताच निर्णय देण्यात आला नाही. सवलतीच्या दरात घरपट्टी भरण्यासाठी आणखी पाच दिवसांचा अवधी आहे. त्यानंतर पुन्हा सवलत मिळणार की दंड आकारणार? हे समजणार आहे. याबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधला असता, अजून तरी याबाबत कोणताही आदेश आला नसल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.