बारा जुगाऱ्यांकडून पाच लाखांची रोकड जप्त
हिरेबागेवाडी पोलिसांची मुत्नाळ येथे कारवाई
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात मटका, जुगार खुलेआम सुरू आहे. सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुत्नाळ, ता. बेळगावजवळील एका शेडवर छापा टाकून बारा जुगाऱ्यांना अटक केली असून त्यांच्याजवळून 4 लाख 81 हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. मंगळवार दि. 15 ऑक्टोबर रोजी रात्री मुत्नाळपासून हिरेबागेवाडी टोलनाक्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्याला लागूनच असलेल्या एका शेडवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग व उपायुक्त रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीने छापा टाकला आहे.
सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार यांच्या नेतृत्वाखाली हवालदार जी. आर. शिरसंगी, एस. बी. पाटील, एम. एम. वडेयर, ए. एन. रामनगोंडनट्टी, एम. एस. पाटील आदींचा समावेश असलेल्या पथकाने छापा टाकून बारा जुगाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे.शहाबाद खादीरसाब तिगडी, रियाज हुसेनसाब पटेल, दोघेही रा. हिरेबागेवाडी, स्वप्नेश तवनाप्पा बेन्नाळी, रा. गोकाक, इराप्पा बसाप्पा मदनहळ्ळी, रा. बैलहोंगल, प्रकाश रायाप्पा नायकर, रा. कारीमनी, यल्लाप्पा बाळाप्पा अरेन्नावर, रा. गोकाक, इराप्पा यल्लाप्पा नायकर, रा. सोमनट्टी, लिंगनगौडा शिवनगौडा पाटील, रा. देवलापूर, मलिकजान रसूलसाब उस्ताद, रा. हिरेबागेवाडी, चेतन मारुती चंदगडकर, रा. सांबरा, यल्लाप्पा हणमंत जट्टण्णावर रा. देवलापूर, मल्लिकार्जुन चन्नमल्लाप्पा होटी, रा. बैलहोंगल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.