For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुमकूरजवळील अपघातात पाच ठार

06:16 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
तुमकूरजवळील अपघातात पाच ठार
Advertisement

दोन कारची धडक : गंभीर दोघांची प्रकृती चिंताजनक

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

सण आटोपून बेंगळूरला जात असताना दोन कारची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तुमकूर जिल्ह्याच्या मधुगिरी तालुक्यातील केरेगळपाळ्याजवळ रविवारी रात्री ही घटना घडली. मृतांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. योगीश आणि सिंधू (दोघेही रा. पावगड ) अशी मृतांची नावे असून अन्य तिघांची नावे समजू शकलेली नाहीत. जखमींना उपचारासाठी तुमकूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

याबाबत माहिती अशी की, योगीश यांचे कुटुंब सण आटोपून वाय. एन. होसकोटेहून बेंगळूरकडे जात होते. दरम्यान, कोरटगेरेहून मधुगिरीकडे येणाऱ्या कारला जोराची धडक दिली. या धडकेत योगीश यांच्या कारमधील चौघेजण तर दुसऱ्या कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे. याची माहिती मिळताच तुमकूरचे एसपी अशोक के. व्ही. यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Advertisement
Tags :

.