For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिलिंडर स्फोटात पाच घरे जळून खाक

10:11 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिलिंडर स्फोटात पाच घरे जळून खाक
Advertisement

कारवार : येथून जवळच्या मुदगा येथील सी-बर्ड नाविक प्रकल्पातील लेबर कॉलनीत सिलिंडर स्फोट होऊन पाच घरे जळून खाक झाल्याची दुर्घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि कॉलनीत वास्तव्य करून राहणाऱ्या मजुरांनी वेळेत आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, मुदगा येथील सी-बर्ड नाविक प्रकल्पातील लेबर कॉलनीत एनसीसी ठेकेदार कंपनीच्या 150 शेड्समध्ये शेकडो मजूर वास्तव्य करून राहतात. बी 2 लाईनमधील एका शेडमध्ये सिलिंडर स्फोट झाला आणि शेडला आग लागली. बघता बघता आन्य शेड्सनाही आग लागली आणि पाच शेड्स जळून खाक झाले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि कॉलनीतील मजुरांनी आग आटोक्यात आणली. रविवारी सुटीचा दिवस असल्याने सर्व मजूर घरीच होते. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.