For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवारला कैद्यांचा जेलरवर प्राणघातक हल्ला

06:57 AM Dec 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
कारवारला कैद्यांचा जेलरवर प्राणघातक हल्ला
Advertisement

अन्य तीन कर्मचारी गंभीर जखमी : उपचारासाठी रुग्णालयात दाखल, वरिष्ठांकडून पाहणी

Advertisement

प्रतिनिधी/ कारवार

येथील जेलमधील कुख्यात कैद्यांनी कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली आहे. कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात जेलर कल्लाप्पा बस्ती आणि अन्य तीन कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुख्यात कैद्यांची नावे मोहम्मद अब्दुल फयान आणि कौशिक निहाल अशी आहेत.

Advertisement

या खळबळजनक घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, मंगळूर येथील जेलमध्ये कैद्यांची संख्या अधिक झाल्याने सुरक्षिततेच्या कारणासाठी फयान आणि  निहाल या कैद्यांना काही महिन्यांपूर्वी येथील जेलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या कुख्यात कैद्यांवर दरोडा, खुनाचे प्रयत्न आणि खंडणी आदी स्वरुपाचे बाराहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जेल प्रशासनाकडून कैद्यांच्या बाबतीत कडक धोरण हाती

गेल्या काही आठवड्यापासून येथील जेलर कल्लाप्पा बस्ती यांच्या नेतृत्वाखाली जेल प्रशासनाने कैद्यांच्या बाबतीत कडक धोरण हाती घेतले आहेत. यामध्ये कैद्यांची आणि व्हिटीटरस्ची तपासणी करणे, जेलमध्ये आणल्या जाणाऱ्या पार्सल आणि जेवणाची तपासणी करणे, मोबाईल वापरावर बंदी घालणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमलीपदार्थ बाळगणे किंवा वापरणे यांच्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

जखमी कैद्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल

शनिवारी अमलीपदार्थावर लादण्यात आलेल्या निर्बंधावर कुख्यात कैदी फयान, निहाल आणि जेलर कल्लाप्पा बस्ती व अन्य कर्मचाऱ्यांच्या दरम्यान शाब्दीक चकमकी झाल्या. शाब्दीक चकमकीनंतर कैद्यांनी अचानकपणे जोर आणि अन्य तीन कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. यावेळी कैद्यांनी जेलर आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावरील युनिफॉर्मही फाडला. या घटनेच्यावेळी एक कैदीही जखमी झाला असून त्यालाही उपचारासाठी जिल्हा रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याने उर्मटपणा दाखविल्याचे सांगण्यात आले. घटनेची नोंद कारवार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून संबंधितांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन आणि जेल गुन्ह्dयांतर्गत प्रकरणे दाखल केली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जेल आणि रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली असून, संबंधितांना विशेष सूचना दिल्या आहेत.

Advertisement
Tags :

.