For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यंदा आयपीएलमध्ये पाच नव्या दमाचे खेळाडू करणार नेतृत्व

06:50 AM Mar 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
यंदा आयपीएलमध्ये पाच नव्या दमाचे खेळाडू करणार नेतृत्व
Advertisement

 22 मार्च पासून आयपीएलला प्रारंभ : दिल्ली, लखनौ, पंजाब, आरसीबी व केकेआरकडे नवे कॅप्टन 

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आयपीएलच्या 18 व्या हंगामाचा बिगुल वाजलाय. आयपीएलमधील सर्व 10 संघांनी सराव करण्यास देखील सुरुवात केलीये. या नव्या हंगामात आयपीएलमध्ये 5 नव्या दमाचे युवा कर्णधार नेतृत्व करताना दिसणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सने कर्णधारपदाची धुरा फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलच्या खांद्यावर सोपण्याचा निर्णय घेतला असून याशिवाय सर्व 10 संघांनी देखील त्याचे कर्णधार जाहीर केले आहेत.

Advertisement

आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स, रॉयल चैलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट राइडर्स नव्या कर्णधारांसह मैदानात उतरणार आहे. दिल्लीने अक्षर पटेलवर, लखनौने ऋषभ पंतवर, पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरवर, आरसीबीने रजत पाटीदार याच्यावर तर केकेआरने अजिंक्य रहाणेवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.

22 मार्चपासून आयपीएलच्या हंगामाला प्रारंभ

आयपीएल 2025 च्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यावेळी आयपीएलचे सर्व सामने एकूण 13 शहरांमध्ये खेळवले जाणार असून आयपीएल 2025 चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना 22 मार्च रोजी रात्री 7.30 वाजता सुरु होईल, तर नाणेफेक अर्ध्या तासापूर्वी म्हणजेच 7 वाजता सुरु होणार आहे. आरसीबीने यावेळी कर्णधारपदाची धुरा रजत पाटीदार यांच्यावर सोपवली आहे, तर केकेआरचं नेतृत्व अजिंक्य राहाणेकडे असणार आहे.

तसेच यंदाच्या आयपीएलचे ओपनिंग सेरेमनी कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे. ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलीवूडचे अनेक कलाकार आणि सेलिब्रिटी परफॉर्म करताना दिसणार आहेत. मात्र, यावेळी कोण कोण उपस्थित राहणार? याबाबतची माहिती आत्तापर्यंत समोर आलेली नाही. आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीचा कार्यक्रम 22 मार्च रोजी रात्री 6 वाजता सुरु होईल.

आयपीएलमधील दहा संघाचे कर्णधार

  1. दिल्ली कॅपिटल्स - अक्षर पटेल
  2. सनराइजर्स हैद्राबाद - पॅट कमिन्स
  3. रॉयल चैलेंजर्स बेंगळूर- रजत पाटीदार
  4. राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन
  5. पंजाब किंग्स - श्रेयस अय्यर
  6. लखनौ सुपर जायंट्स - ऋषभ पंत
  7. मुंबई इंडियन्स - हार्दिक पंड्या
  8. कोलकाता नाइट राइडर्स - अजिंक्य रहाणे
  9. गुजरात टायटन्स - शुभमन गिल
  10. चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड
Advertisement
Tags :

.