For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपा कारवाईमुळे आनंदनगर येथील पाच कुटुंबे वाऱ्यावर

10:33 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनपा कारवाईमुळे आनंदनगर येथील पाच कुटुंबे वाऱ्यावर
Advertisement

पुनर्वसन केल्याचा दावा खोटा : मनपाकडून उघड्यावर पाडल्याचा नागरिकांचा आरोप

Advertisement

बेळगाव : आनंदनगर, वडगाव येथे मनपा नाल्याच्या जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेले शेड हटविण्यात आली आहे. त्यामुळे तेथील रहिवासी उघड्यावर पडले आहेत. मनपाकडून पुनर्वसन केले असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अशी कोणतीच कृती झाली नसल्याचे संबंधित नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. आनंदनगर,वडगाव येथील नाल्यावर अतिक्रमण केल्याचे सांगत मनपाकडून तेथील रहिवाशांवर बुलडोजर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या 40 वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या कुटुंबीयांना तेथून हटविण्यात आले आहे.

सदर जागा मनपाच्या मालकीची असून, त्याठिकाणी असलेल्या नाल्यावर अतिक्रमण केले असल्याचे मनपा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांना शेड काढून घेण्यासाठी सूचना करण्यात आली होती. मात्र, शेड हटविली नसल्याने नाल्याला अडचण ठरत असल्याच्या कारणावरून कारवाई करण्यात आली असल्याचे मनपा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तेथील पाच कुटुंबीयांची शेड हटविण्यात आली आहेत. सदर कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तेथील रहिवाशांकडून मनपाकडून आपल्याला उघड्यावर पाडले असल्याचा आरोप केला जात आहे. सदर जागेवर नाला नसून मालकी जागा आहे. मनपाकडून बळजबरीने आपल्याला हटविण्यात आले असल्याचा आरोप केला जात आहे.

Advertisement

मनपा अधिकाऱ्यांच्या कारवाईबद्दल उलटसुलट चर्चा 

पाच कुटुंबे गेल्या 40 वर्षांपासून वास्तव्यास असून,अचानक हटविण्यात आल्याने भरपावसात आपले कुटुंब उघड्यावर पडले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पाच कुटुंबातील 30 नागरिकांना मंदिरामध्ये व इतर ठिकाणी आसरा घ्यावा लागला आहे. पुनर्वसन केले असल्याची खोटी माहिती दिली असल्याचा आरोप सदर कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. मनपा अधिकाऱ्यांच्या या कृतीबद्दल माजी नगरसेवकांकडूनही आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे मनपा अधिकाऱ्यांच्या कारवाईबद्दल उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Advertisement
Tags :

.