जोरदार पावसाचा पाच दिवस अलर्ट
कोल्हापूर :
गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पाऊस झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील धरणे फुल्ल झाली आहेत. एकूण सहा धरणे 100 टक्के भरली आहेत. तर पाच धरणांचा पाणीसाठा 75 टक्क्याहून अधिक झाला आहे. राधानगरी धरणाचा पाणीसाठा 69 टमक्मयावर पोहचला असुन पावसाचा जोर वाढल्यास यामध्ये वाढ होणे अटळ आहे. यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यातच धरणसाठ्यात 50 टक्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महापुराचा धोका उराशी अशी स्थिती निर्माण झाली आहे.
हवामान खात्याने यावर्षी 100 टक्याहून अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जूनमध्येच 106 टक्के पावासाची नोंद करण्यात आली आहे. पावासाचा जोर वाढल्यास जिल्ह्यात 2019 हून अधिक गंभीर पुरस्थितीचा धोका उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा हवामान बदलाच्या परिणामामुळे मे महिन्यातच दमदार पावसाला सुरूवात झाली. जूनमध्येही पावासाची संततधार सुरूच राहिली. यामुळे धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. अद्याप जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे तीन महिने पावसाचे आहेत. या दरम्यान मुसळधार पाऊस झाल्यास महापुराचा धोका गडद होणार असल्याचे चित्र आहे.
- सतर्कतेचा इशारा
रत्नागिरीसह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
- प्रशासनाने सज्ज राहण्याची गरज
महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा अपत्ती व्यवस्थापनाकडून नदी काठच्या गावांवर लक्ष केंद्रीत केले असुन महापुराच्या पार्श्वभुमीवर यंत्रणा सज्ज केली आहे.
- भूस्खलन प्रवण क्षेत्राला धोका
पाऊस अधिक झाल्यामुळे भूस्खलन प्रवण क्षेत्रातील गावांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दरड कोसळणे, रस्ता खचणी आदी पासुन खबरदारीची गरज आहे.
- जून महिन्यातच सरासरी गाठली
यंदा हवामाना खात्याने 110 टक्के पावसचा अंदाज व्यक्त केला होता. मे महिन्याच्या मध्यंतरापासुनच पावसाला सुरूवात झाली. पावसाने दमदार हजेरी लावल्याने जून महिन्यातच पावसाने सरासरी गाठली आहे. जून महिन्यात दुप्पट पाऊस झाला असुन सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडला आहे.
- जिल्ह्यातील धरणसाठा :
धरणाचे गतवर्षीचा पाणीसाठा सध्याचा पाणीसाठा
राधानगरी : 33 टक्के 75 टक्के
तुळशी : 40 टक्के 70 टक्के
वारणा : 37 टक्के 78 टक्के
दुधगंगा : 20 टक्के 58 टक्के
कासारी : 35 टक्के 70 टक्के
कडवी : 53 टक्के 77 टक्के
कुंभी : 34 टक्के 71 टक्के
पाटगाव : 46 टक्के 83 टक्के
चिकोत्रा : 34 टक्के 68 टक्के
चित्री : 33 टक्के 96 टक्के
जंगमहट्टी : 44 टक्के 100 टक्के
घटप्रभा : 100 टक्के 100 टक्के
जांबरे : 79 टक्के 100 टक्के
आंबेओहोळ : 72 टक्के 100 टक्के
सर्फनाला : --- 100 टक्के
धामणी : --- 95 टक्के
कोदे : 54 टक्के 100 टक्के
- जुलै ते ऑगस्ट 'डेंजर टाईम'
यापुर्वी जुलै ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान महापुर येण्याच्या घटना घडल्या आहेत. याच महिन्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. 1986, 1995, 2019 व 2021 या वर्षी जुलै ते ऑगस्ट दरम्यान कोल्हापुरला महापुराचा फटका बसला आहे. यंदा तर पहिल्यांदाच सर्व धरणे 75 टक्क्याहून अधिक भरली आहे. जुलै ते ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाल्यास महापुर गंभीर स्थिती होण्याची शक्यता आहे.
- महापुरासह भूस्खलनचाही धोका
यंदा मध्येच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांचा पाणीसाठा वाढला आहे. अजून पुढे पावसाची शक्यता वर्तवली जात असल्याने महापुराचा धोका संभव आहे. त्याचबरोबर मुसळधार पाऊस, भूकंप यामुळे भूस्खलनचे धोकाही संभव आहे. जंगलतोड, डोंगरी भागात खोदकाम, डोंगराचा तीव्र उतार, खडकांची रचना आदी कारणांमुळे भूस्खलनचा अधिक धोका वाढतो.
-डॉ. युवराज मोटे, भूगोल व पर्यावरण अभ्यासक