For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वचन साहित्य भाषांतरासाठी पाच कोटी अनुदान

11:39 AM Jul 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
वचन साहित्य भाषांतरासाठी पाच कोटी अनुदान
Advertisement

पोलीस उपअधीक्षक बसवराज यलीगार यांच्या गौरव कार्यक्रमात एम. बी. पाटील यांची घोषणा

Advertisement

विजापूर : बसवतत्त्व व वचन साहित्याचे वेगवेगळ्या भाषेत भाषांतर करण्यासाठी पाच कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा उद्योगमंत्री व विजापूरचे पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी केली. पोलीस उपअधीक्षक बसवराज यलीगार यांनी बसवेश्वरांच्या वचनांचे इंग्रजीत भाषांतर केले आहे. त्यामुळे विजापूरकरांच्यावतीने रविवारी त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या समारंभात बोलताना पालकमंत्र्यांनी वरील घोषणा केली. कंदगल हणमंतराय रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात मंत्री पाटील म्हणाले, पोलीस दलासारख्या नेहमी दबावाखाली व धाकधुकीच्या खात्यात काम करूनही बसवराज यलीगार यांनी महात्मा बसवेश्वरांचे वचन इंग्रजीत भाषांतरित केले आहेत. बसवतत्त्व जगभरात पोहचविण्यासाठी त्यांनी केलेले काम मोलाचे ठरणार आहे. वचन साहित्य हीच आमची संपत्ती आणि संस्कृती आहे.

फ. गु. हळकट्टी यांनी केलेल्या संशोधनामुळे बाराव्या शतकातील 200 संतांचे साहित्य आपल्याला मिळाले आहे. बसवकल्याण बसवमहामने संस्थेचे डॉ. सिद्धराम बेलदाळ, शरण विजापूर तबलीक जमातचे मौलाना अबूबकर, अमेरिकेतील फ्लोरिडा येथील प्रा. गिल्ल बेन हेरुथ, साहित्यिक देवनुरू शंकर, विधानपरिषदेचे माजी सदस्य अरुण शहापूर, बेंगळूर येथील अक्कनमने प्रतिष्ठानच्या सी. सी. हेमलता, साहित्यिक व्ही. आर. बनसोडे, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अप्पर जिल्हाधिकारी सोमलिंग गेन्नूर, साहित्यिक राजशेखर मठपती, महांतेश बिरादार, बी. आर. बनसोडे, सानिया जिद्दी, शरणू सबरद आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पोलीस उपअधीक्षक बसवराज यलीगार दांपत्याचा विजापूरकरांतर्फे डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची 40 पुस्तके देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात जातीय सलोख्याचे दर्शन घडले. बसवतत्त्व केवळ भारतीयांसाठीच नाही तर जगभरातील नागरिकांसाठी आवश्यक आहे, हे फ्लोरिडाचे प्रा. गिल्ल बेन हेरुथ यांनी ठासून सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.