रुग्णाच्या पोटात तरंगणारा मासा
एक इसम तीव्र पोटदुखीच्या तक्रारीसह रुग्णालयात पोहोचला होता, डॉक्टरांनी त्याचे सीटी स्कॅन केले असता रुग्णाच्या पोटात एक फूट लांब जिवंत मासा तरंगताना दिसून आला, यानंतर अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करत या माशाला ऊग्णाच्या शरीरातून बाहेर काढण्यात आले आहे. चीनच्या हुनान प्रांतातील एका व्यक्तीच्या या असामान्य प्रकरणाने आता प्रसिद्धी मिळविली आहे. यानुसार हुनान वैद्यकीय विद्यापीठाशी संबंधित रुग्णालयात हा व्यक्ती पोटदुखीच्या तक्रारीसह पोहोचला होता. पोटात दिसून आला मासा व्यक्तीच्या पोटाच्या सीटी स्कॅनमध्ये एक लांब वस्तू तरंगताना दिसून आली, जी त्याच्या पोटात शिरली होती आणि यामुळे या व्यक्तीचे पोट टणक झाले होते. यामुळे संभाव्य घातक पेरिटोनिटिसच्या भीतीने डॉक्टरांनी लॅप्रोस्कोपिक आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
पोटाच्या अंतर्गत भागात ईजा
यादरम्यान रुग्णाच्या पोटाची तपासणी करत असताना त्याच्या अवयवांदरम्यान एक जिवंत ईल मासा तरंगताना पाहून डॉक्टर चकित झाले. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना ईल माशाने आतड्यांच्या आवरणाला पूर्णपणे छेदले असल्याचे आणि तो पोटाच्या अंतर्गत भागात तरंगत असल्याचे पाहिले. यावर त्वरित उपचार न केल्यास धोका वाढण्याची भीती होती.
माशाला पोटातून बाहेर काढले
क्लॅम्प सारख्या उपकरणाचा वापर करत सर्जन ईल माशाला पकडण्यास आणि बाहेर काढण्यास यशस्वी ठरले. शस्त्रक्रियेनंतर हा व्यक्ती बरा झाला आणि त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ईल एक लपून राहणारा जलीय जीव असून तो शेत, तलाव, सरोवर, नद्या आणि कालव्यांच्या गाळात आढळून येतो. ईल मासा नरम मातीत छेद करण्यासाठी ओळखला जातो. यामुळे तो सहजपणे मानवी आतड्यांना छिद्र पाडू शकतो. परंतु या व्यक्तीच्या पोटात जिवंत मासा कसा पोहाचला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.