आधी मराठा आरक्षणाची जबाबदारी, मग कुटूंबाकडे दिले लक्ष
मराठा आरक्षणाचा प्रश्न धगधगत होता. लाखो मराठ्यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबई पर्यंत धडक दिली होती. तर दुसरीकडे सरकारचे धाबे दणाणले होते. मुख्यमंत्र्यांच्यासह मंत्रिमंडळ जरांगे पाटलांच्या बरोबर चर्चेच्या फेऱ्यात गुंतले होते. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मुंबईकडे लागून राहील होत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या सोबत वाटाघाटी व चर्चा करण्याची जबाबदारी दिली ती म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या कडे. चिवटे यांनी देखील आपल्या खांदयावरील जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडत यशस्वी शिष्टाई करत आरोग्यदूत ते संवाददुत अशी मोलाची भूमिका बजावली ती मंगेश चिवटे यांनी आणि याच वेळी होता चिवटे यांचा चिरंजीव ज्ञानेशचा वाढदिवस छोटा ज्ञानेश देखील आपल्या वाढदिवसाला बाबा येतील म्हणून त्यांच्या वाटे कडे डोळे लावून बसला होता. त्याला पुसटशीही कल्पना नव्हती आपले वडील कोणत्या कामात अडकले आहेत ? त्यांच्या खांदयावर कोणती जबाबदारी आहे ? त्यांना किती वेळ लागेल ? या कोणत्याही गोष्टीची कल्पना नसलेला निरागस ज्ञानेश आपल्या बाबांची फक्त वाट पाहत बसला होता. वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस त्यात लहान बाळाचा वाढदिवस असेल तर त्याला आभाळ ठेंगणे, ज्ञानेश चा वाढदिवस मात्र याला अपवाद ठरला होता.त्याचे कारणही तसेच होते त्याचे वडिल मराठा आरक्षण आंदोलनकर्ते व सरकार यांच्या मध्ये संवादसेतू बांधण्यात व्यस्त होते. ज्या पद्धतीने शिवछत्रपतींच्या इतिहासात सुभेदार तानाजी मालुसरे यांनी उद्दगार काढले होते "पहिलं लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे"! असे म्हणत कोंढाण्याच्या मोहिमेवर गेले होते. तशीच जबाबदारी मंगेश चिवटे यांनी पार पाडत हि मोहिम सर केली. आणि तब्बल १५ दिवसांनी आपल्या लाडक्या ज्ञानेशचा वाढदिवस साजरा केला.आरोग्यदूत ते संवाददुत नेटाने जबाबदारी पेलून अखेर करोडो मराठयांच्या आयुष्यात तो सुवर्णक्षण चिवटे यांनी आणलाच. या आंदोलनात मंगेश चिवटे अनेक वेळा ट्रोल झाले कोण हा मंगेश चिवटे का मध्ये लुडबुड करतोय ! अश्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या. पण या सर्वांच्या कडे दुर्लक्ष करत आपली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पडली ती म्हणजे मंगेश चिवटे यांनी.