पहिली प्रीमियर लीग तिरंदाजी स्पर्धा ऑक्टोबरमध्ये
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
यमुना क्रीडा संकुलाच्या परिसरात फ्रांचायजी आधारीत पहिली प्रीमियर लीग तिरंदाजी स्पर्धा 2 ते 12 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये विविध देशांचे अव्वल 48 तिरंदाजपटू सहभागी होत असून त्यामध्ये कंपाऊंड तिरंदाजी प्रकारातील टॉप सिडेड आंद्रे बिसेरा आणि रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारातील टॉपसिडेड ब्रॅडी इलिसन यांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये सहा संघांचा समावेश राहील. मेक्सिकोचा सहावा मानांकीत तिरंदाजपटू मॅटेस ग्रेनेडी (रिकर्व्ह) तसेच महिला तिरंदाजपटू कंपाऊंडमधील टॉपसिडेड युनो स्कोलेसर (नेदरलँड्स) यांचा समावेश आहे.
या स्पर्धेसाठी भारतीय तिरंदाजपटूंची निवड विश्व मानांकनाच्या जोरावर तसेच अलिकडेच घेण्यात आलेल्या निवड चाचणीनंतर करण्यात आली आहे. तृतिय माकांनीकत दिपीका कुमारी आणि 14 वा मानांकीत धिरज तसेच अनुभवी तरुणदीप राय, अतेनो दास, महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात अंकिता भक्त, भजन कौर तर पुरूषांच्या विभागात निरज चौहान, राहुल, रोहीतकुमार, मृणाल चौहान, सचिन गुप्ता आणि कृषकुमार यांचा समावेश आहे. कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात विश्वविक्रमवीर भारताचे ज्योती सुरेखा वेन्नम, तसेच पुरूषांच्या विभागात ऋषभ यादव, अनुभवी अभिषेक वर्मा, प्रथमेश फुगे, प्रियांश, परनीत कौर, अमन सैनी, ओजस देवतळे, साहील राजेश, अवनीत कौर, मधुरा धामणगावकर आदी भारतीय तिरंदाजपटू या स्पर्धेत सहभाग दर्शवित आहे.
एपीएलमधील संघ
- पृथ्वीराज योद्धाज : मथायस ग्रेनेडी, आंद्रे बिसेरा, अभिषेक वर्मा, गाथा आनंदद्रु, प्रियांशू, शर्वरी शेंडे, कृषकुमार आणि प्रांजळ साळवे.
- चेरो आर्चर्स : मथायस फुलेरटोन, कॅथरिना बॉर, राहुल, प्रितीका प्रदीप, अतानू दास, माडाला हमशिनी, साहील राजेश आणि कुमकुम मोहोद.
- कार्तिकेय नाईट्स : निको वेनेर, इलीया कॅनेलिस, निरज चौहान, ज्योती सुरेखा वेन्नम, रोहीतकुमार, अवनीत कौर, जिगनेस आणि तिशा पुनिया,
- चोला चिफ्स : ब्रॅडी एलिसन, मेरी पेस, ऋषभ यादव, दिपीका कुमारी, तरुणदीप राय, टी. चिकिता, पुलकित काजला आणि अंशीका कुमारी.
- मायटी मराठाज : मिकी स्कोलेसर, अॅलेजेंड्रा व्हॅलेन्सिया, धिरज बोमदेवरा, परनीत कौर, अमन सैनी, भजन कौर, मृणाल चौहान आणि डी. मधुरा
- राजपूताना रॉयल्स : मेटे गॅझो, इलिया गिब्सन, प्रथमेश फुगे, अंकिता भक्त, ओजस प्रवीण, वसंती महातो, सचिन गुप्ता, स्वाती दुधवाल.