महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

यंदाची पहिली उचल, गतहंगामातील हप्त्याबाबत बैठक घ्या

04:40 PM Nov 26, 2024 IST | Radhika Patil
First pick up of the year, hold a meeting regarding the installments from the previous season
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने 25 ऑाक्टोंबर रोजी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेमध्ये गळीत हंगाम सन 23-24 गळीत हंगामातील 200 रूपये अंतिम हप्ता व गळीत हंगाम 2024-25 च्या 3700 रूपयाच्या प्रतिटन पहिल्या उचलीची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत असून मागण्यांबाबत साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची येत्या 15 दिवसात तातडीने बैठक घेऊन मार्ग काढण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कुणाल खेमनार यांचेकडे केली.

Advertisement

चालू वर्षीचा गळीत हंगाम 15 नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत अनेक साखर कारखानदार निवडणूक लढविण्यात गुंतल्याने साखर कारखान्यांचा गाळप हंगाम नोव्हेंबर अखेर सुरू होण्याची शक्यता आहे. यंदाच्या पावसाळ्यातील महापूर व लांबलेला गळीत हंगाम यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कडक उन्हाळ्यामुळे ऊसतोडीसाठी मजूराकडून व ऊस तोडणी मशिन मालकाकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असून एकरी 5 ते 10 हजार रूपयाची मागणी केली जात आहे.

सोलापूर जिह्यातील 10.80 रिकव्हरी असणाऱ्या कारखान्याने 3500 रूपये पहिली उचलीचा दर जाहीर केलेला आहे. तर 12 ते 12.30 टक्के रिकव्हरी असणाऱ्या साखर कारखान्यांना तोडणी वाहतूक वजा जाता 3700 रूपये पहिली उचल जाहीर करण्यास काहीच अडचण नाही. येत्या 15 दिवसात जर काही निर्णय झाला नाही तर शासन व साखर कारखानदार यांना तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागणार असून या आंदोलनाने झालेल्या नुकसानीस संघटना जबाबदार असणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article