महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पहिली राष्ट्रीय महिला हॉकी लीग रांचीमध्ये 30 पासून

06:42 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पहिल्या राष्ट्रीय महिला हॉकी लीगचे आयोजन रांचीमध्ये 30 एप्रिल ते 10 मे या कालावधीत होणार असल्याचे हॉकी इंडियाने जाहीर केले.

Advertisement

नवोदित हॉकीपटूंना आपले कौशल्य व क्षमता वाढविण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देणे हा या लीगचा उद्देश आहे. पुणे येथे झालेल्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठलेले आठ संघ या आगामी लीगमध्ये प्राथमिक फेरीत खेळतील. हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, मध्यप्रदेश, बंगाल, मिझोरम, मणिपूर व ओडिशा हे ते आठ संघ आहेत. याशिवाय यू-21 खेळाडूंही या स्पर्धेत सहभागी होतील. यामुळे निवडकर्त्यांना प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करण्याची संधी मिळणार आहे.

या लीगच्या दुसऱ्या टप्प्याच्या तारखा अद्याप निश्चित करावयाच्या आहेत. ‘राष्ट्रीय महिला हॉकी लीग हा भारतीय हॉकीमधील नवा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे, विशेषत: महिला हॉकीपटूंसाठी. या लीगमुळे महिला हॉकीपटूंच्या विकासासाठी, प्रगतीसाठी आम्ही बांधिलकी जपली असल्याचाच हा पुरावा आहे,’ असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी म्हटले आहे. या लीगचा दुसरा टप्पा पुढील वर्षी होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article