For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिली हिमालयन एअर सफारी चाचणी यशस्वी

06:22 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
पहिली हिमालयन एअर सफारी चाचणी यशस्वी
Advertisement

गायरोकॉप्टर साहसाची उत्तराखंडमधून सु रूवात : पर्यटनाला चालना देण्यासाठी अनोखा उपक्रम

Advertisement

वृत्तसंस्था/ हरिद्वार

देशातील पहिली हिमालयन एअर सफारी उत्तराखंडमधून सुरू झाली. गायरोकॉप्टर अॅडव्हेंचर सुरू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य आहे. हरिद्वारमधील बैरागी कॅम्पमध्ये नुकतीच गायरोकॉप्टरची उड्डाण चाचणी यशस्वी झाली. पर्यटन विभागाला गायरोकॉप्टरद्वारे हवाई सफारीसाठी डीजीसीएची मान्यता मिळाली आहे. राज्यातील साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी हा अनोखा उपक्रम आहे.

Advertisement

राजस एरो स्पोर्ट्स अँड अॅडव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने उत्तराखंड पर्यटन विकास परिषदेने राज्यात गायरोकॉप्टरद्वारे हवाई सफारी सुरू केली आहे. सिंगल सीट एरोकॉप्टरसह पर्यटक हवेतील थराराचा आनंद घेऊ शकतात. या सफारीमध्ये हिमालय आणि नैसर्गिक सौंदर्याची जवळून पाहणी केली जाऊ शकते. यासोबतच हिमालय, पर्वतराजी आणि नद्यांचे हवाई दृश्य अनुभवता येते. या मोहिमेसाठी सिंगल सीटर एरोकॉप्टर जर्मनीकडून खरेदी करण्यात आले आहे. यामुळे साहसी पर्यटनाला चालना मिळेल. गायरोकॉप्टरच्या सहाय्याने पर्यटकांना राज्यातील अस्पर्शित पर्यटनस्थळांपर्यंत सहज पोहोचता येणार असल्याचे पर्यटन विकास परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी पुंडिर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.