महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रोटरी क्लबतर्फे बाबुराव ठाकुर कॉलेजमध्ये प्रथमोपचार शिबिर

06:17 AM Sep 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटतर्फे जांबोटी येथील बाबुराव ठाकुर कॉलेजमध्ये प्रथमोपचार शिबिर घेण्यात आले. केएलई नर्सिंग कॉलेजच्या सहकार्याने हे शिबिर झाले. यावेळी डॉ. मंजुनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचार म्हणजे काय? याबद्दल प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.

Advertisement

क्लबचे अध्यक्ष सचिन हंगिरगेकर यांनी शिबिराचा हेतू स्पष्ट केला. डॉक्टर येण्यापूर्वी अत्यवस्थ रुग्णावर कोणत्या पद्धतीने प्रथमोपचार करावेत हे समजावे या हेतूने शिबिर घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्या पूजा पाटकर यांनी सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी सचिव विशाल मुरकुंबी, ऋषभ मुंदडा, हेमेंद्र पोरवाल, दीपक कलबुर्गी, सौरभ मेहता, पार्थ देवानी आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article