विहिरीत पडलेल्या कुत्र्याला अग्निशमन दलाकडून जीवदान
10:44 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : विहिरीत पडलेल्या कुत्र्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवदान दिले आहे. रविवारी सकाळी आनंदनगर, वडगाव परिसरात ही घटना घडली आहे. साई कॉलनी-आनंदनगर, वडगाव परिसरातील एका नव्या बांधकामासमोरील सुमारे 35 फूट विहिरीत एक कुत्रा पडला. ही गोष्ट लक्षात येताच त्या कुत्र्याला वाचविण्यासाठी तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. साहाय्यक अग्निशमन अधिकारी अरुण माळोदे, नागाप्पा बडवण्णवर, अल्लाबक्ष बंगारगुंड, एस. के. पाटील आदी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत पडलेल्या कुत्र्याला त्यांनी पाण्याबाहेर काढले.
Advertisement
Advertisement