महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डीआरडीओ इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग

06:01 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

येथील डीआरडीओ मेटकाल्फ हाऊस इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 18 बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सिव्हिल लाईन्समधील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या इमारतीला दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती दिल्ली अग्निशमन सेवा अधिकाऱ्यांनी दिली. सहाव्या मजल्यावरील मीटिंग हॉलमध्ये आग लागताच सर्व कर्मचारी इमारतीच्या बाहेर आले. आगीमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Advertisement

शुक्रवारी घडलेल्या या घटनेपूर्वी उत्तर-पश्चिम जिल्ह्यातील पीतमपुरा भागात गुऊवारी रात्री एका चार मजली इमारतीला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही आग इतकी भीषण होती की घरातील लोकांना बाहेर येण्याची संधीही मिळाली नाही. काही लोकांनी छतावर जाऊन स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण अपयश आले. अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्मयात आणली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article