पाच गावांच्या डोंगराला आग
कोल्हापूर :
राधानगरी प्रादेशिक वन विभाग क्षेत्रातील गैबी सर्कल हद्दीत येण्राया सोळांकुर,सुळंबी मोघर्डे, कुडूत्री, करंजफेण, खिंडी व्हरवडे व गुडाळ येथील प्रादेशिक वनाला व खाजगी मालकीचा गवत डागांना आग लागून वन्यसंपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गवत व आंब्याच्या बागांना वनवा लागल्याने दिडशे एकरातील गवताचे नुकसान आहे. त्यांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील शेतक्रयांनी केली आहे.
मंगळवारी रोजी सकाळी खाजगी मालकीचा हद्दीतून आलेल्या आगीने प्रवेश करुन रौद्र रुप धारण केले. डोंगरात गवत कापत असण्राया मजुरांमध्ये अचानक समोरील डोंगरावरील आगीचे लोट पाहून भितीचे वातावरण निर्माण झाले होते. रौद्र रुप धारण केलेले आगीने जंगलक्षेत्राच्या दिशेने जाण्राया आगीला विझवण्यासाठी प्रसंगसावधाने सोळांकुरचे पोलीस पाटील संतोष पाटील,संभाजी पाटील,आनंदा पाटील , राहुल पाटील, मिलिंद पानारी, रोहन पाटील, जयदीप तेली, संभाजी पाटील, बचाराम पाटील, राजेंद्र पाटील, सुनील पाटील श्रीकांत श्रीकांत पानारी ,संजय पानारी यांच्यासह उपस्थित असण्राया महिला मजुरांनी ओल्या झुडप्याच्या साह्याने आग आटोक्यात आणण्याचा जोरदार प्रयत्न केला.
सरवडे वन बीटचा कर्मचार्यांनी धाव घेऊन एअर गनचा सहाय्याने चार तासाचा अथक प्रयत्नाने तेथील आग आटोक्यात आणली.जानेवारी महिन्यातच खाजगी लोक आपले वावर पेटवून देत असल्यामुळे त्याची झळ राखीव जंगलाला बसत आहे. यामुळे वन्यप्राणी, झाडे, पक्षी, किटक यांचा अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांनीही आपले वावर पेटवताना इतर वनसंपत्तीची हानी होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. आग विझवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांसह वनरक्षक एम. डी. आंगज,जितेंद्र साबळे, बंडोपंत देऊलकर, सखाराम गिरी,बाबुराव पाटील व वन रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न केले.