For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गेमिंग झोनमध्ये आग, 12 मुलांसह 24 ठार

06:58 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
गेमिंग झोनमध्ये आग  12 मुलांसह 24 ठार
Advertisement

गुजरात-राजकोटमधील टीआरपी मॉलमधील घटना

Advertisement

वृत्तसंस्था/ राजकोट

गुजरातमधील राजकोट शहरात शनिवारी आगीची मोठी घटना घडली. शहरातील टीआरपी मॉलमधील गेम झोनमध्ये संध्याकाळी 4.30 वाजता भीषण आग लागली. या दुर्घटनेत 12 मुलांसह 24 जणांचा मृत्यू झाला. आगीत काही लोक पूर्णपणे होरपळल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सात जण बेपत्ता असल्याची नोंद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच या भीषण दुर्घटनेप्रकरणी गेम झोनशी संबंधित चार जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

दुपारच्या सुमारास कडाक्मयाच्या उन्हात राजकोटच्या टीआरपी मॉलमध्ये आग लागली. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. आगीत जखमी झालेल्या लोकांना राजकोट सिव्हिल हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. आग इतकी भीषण होती की त्याचा धूर एक किलोमीटर दूरपर्यंत दिसत होता. मिळालेल्या माहितीनुसार, मॉलच्या गेम झोनमध्ये ही आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेत आग आटोक्मयात आणली. मॉलमध्ये आग कशामुळे आणि कुठून लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्याची घटना उघडकीस आल्याने प्रशासनाने सर्व उपाययोजना केल्या मात्र उन्हाळ्यात आग इतकी भडकली की आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढता आले नाही. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या भीषण अपघाताची दखल घेत विशेष तपास पथकामार्फत चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सयाजी हॉटेलजवळ असलेल्या टीआरपी मॉलमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. माहिती मिळताच सर्व यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मॉलमध्ये आग लागली तेव्हा अनेक मुले गेम झोनमध्ये उपस्थित होती. राजकोटमधील आगीच्या घटनेने सुरतमधील तक्षशिला आगीच्या काळ्याकुट्ट आठवणी ताज्या झाल्या आहेत. यामध्ये 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.

लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित

उन्हाळ्याच्या सुटीमुळे गेमझोनमध्ये मोठ्या संख्येने मुले उपस्थित होती. आग लागली त्यावेळी आतमध्ये किती लोक होते याची नेमकी माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही. प्राथमिक वृत्तानुसार, एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यानंतर गेमझोनमध्ये आग लागल्याचे समजते. मात्र, अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दुपारी 4 ते 4.30 च्या दरम्यान लागलेली ही आग तीन तासात आटोक्मयात आणण्यात आली. परंतु ढिगारा हटवणे आणि गेम झोनमध्ये कोणी अडकले आहे की नाही याची खात्री करण्याची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरू होती. राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी सध्या बेपत्ता असलेल्या मुलांचा शोध घेण्याचे आणि मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तसेच या घटनेला जबाबदार असलेल्यांना लवकरच अटक केली जाईल, असेही स्पष्ट केले.

ठेका दुसऱ्याला दिल्याचे उघड

गेमझोनच्या मालकाने गेमझोनचे व्यवस्थापन युवराज जडेजा नावाच्या दुसऱ्या व्यक्तीला दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याचे राजकोट महानगरपालिका आयुक्त आनंद पटेल यांनी सांगितले. हा गेम झोन चालवणाऱ्या व्यक्तीची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. या गेमझोनमध्ये अग्निसुरक्षेची योग्य व्यवस्था होती का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, गेमझोनमधील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित नव्हती. एवढेच नाही तर अनेक अग्निसुरक्षा उपकरणे बंदावस्थेत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. गेम झोनच्या ऑपरेटरने अग्निशमन विभागाकडून एनओसी घेतली नसल्याचे समोर आले आहे.

सौराष्ट्रातील सर्वात मोठा गेम झोन

टीआरपी गेम झोनच्या व्यवस्थापनानुसार ते सौराष्ट्रातील सर्वात मोठे गेम झोन होते. येथे 20 हून अधिक खेळांची सोय होती. टीआरपी गेम झोनमध्ये आग लागल्यानंतर राजकोटमधील सर्व गेम झोन बंद करण्यात आले. तसेच सुरत पोलीस आयुक्तांनी शहरातील गेम झोनद्वारे सार्वजनिक सुरक्षा नियमांचे पालन केले जात आहे की नाही याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राजकोट गेमझोनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.  दुसरीकडे या घटनेच्या तपासासाठी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी एसआयटी स्थापन केली आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख ऊपये आणि जखमींना 50 हजार ऊपयांची भरपाई जाहीर केली आहे.

Advertisement
Tags :

.