महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राजकोटनंतर दिल्लीत अग्नितांडव

06:30 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हॉस्पिटलमधील आगीत 7 नवजात बालकांचा मृत्यू : ऑक्सिजन सिलिंडरच्या स्फोटानंतर आगीचा भडका

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये उडालेल्या आगीच्या भडक्याची घटना ताजी असतानाच शनिवारी मध्यरात्री दिल्लीतील एका बाल ऊग्णालयातात अशीच आणखी एक हृदयद्रावक घटना घडली. विवेक विहार येथील दुर्घटनेत सात नवजात बालकांचा मृत्यू झाला. यात 5 जणांची सुटका करण्यात आली असली तरी त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर राजकीय पडसादही तीव्र झाले असून दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारवर टीकेची झोड सुरू आहे.

राजधानीतील विवेक विहारस्थित हॉस्पिटलच्या दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर न्यू बॉर्न बेबी केअर सेंटर होते. त्यात एकूण 12 मुलांना ठेवण्यात आले होते. त्यापैकी सात जणांना प्राणास मुकावे लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.  आगीपासून सुटका करण्यात आलेल्या 5 मुलांना एनआयसीयू ऊग्णालयात हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बाल ऊग्णालयाचे मालक नवीन कीची यांच्याविऊद्ध आयपीसी कलम 336 (इतरांची वैयक्तिक सुरक्षा धोक्मयात आणणे), 304ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि 34 (गुन्हेगारी क्रियाकलाप) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. दुर्घटना घडल्यापासून ते फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

रात्री साडेअकरा वाजता आग लागल्याची माहिती मिळाल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या एकूण 16 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. तोपर्यंत ज्वाळा वरच्या मजल्यांवर आणि जवळपासच्या दोन इमारतींमध्ये पसरल्या होत्या. बेबी केअर सेंटरमध्ये जाण्यासाठी बाहेरून एक लोखंडी जिना आहे. त्यातही आग लागल्यामुळे मदत व बचाव करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बाल ऊग्णालयाच्या दोन्ही बाजूला असलेल्या दोन निवासी इमारतींमधून 11-12 जणांची सुटका करण्यात आली. अग्निशमन दलाने सुमारे दीड तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.

या दुर्घटनेमागील आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, प्रथमदर्शनी ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. बेबी केअर सेंटरच्या खाली तळमजल्यावर अवैध ऑक्सिजिन सिलिंडर रिफिलिंगचे काम सुरू होते, असे दिल्ली अग्निशमन सेवेचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले. अनेक दिवसांपासून बेबी केअर सेंटरच्या खाली ऑक्सिजन रिफिलिंगचे काम सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

आग लागण्यापूर्वी मोठा आवाज

अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबी केअर सेंटरजवळ एका ऊग्णवाहिकेत ऑक्सिजन गॅस भरला जात होता. त्याचवेळी स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला. यानंतर आग संपूर्ण इमारतीत पसरली. स्फोटाच्या आवाजाने आजुबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले असता इमारतीसमोरील व्हॅनमध्ये ऑक्सिजन सिलिंडर भरण्याचे काम सुरू असल्याचे आढळले. त्यामुळेच सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

रुग्णालय कर्मचाऱ्यांनी काढला पळ

सिलिंडरच्या स्फोटामुळे आग हॉस्पिटलच्या वेगवेगळ्या भागात पोहोचली.  त्यानंतर एकापाठोपाठ आणखी तीन सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग आणखीनच भडकली. आग लागल्याचे समजताच ऊग्णालयातील काही कर्मचारी नवजात मुलांना सोडून पळून गेले. त्यानंतर परिसरात जमलेल्या लोकांनी, नातेवाईकांनी व बचाव पथकाने इमारतीच्या मागच्या बाजूला जाऊन काचा फोडून मुलांना बाहेर काढले.

राष्ट्रपती-पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाल ऊग्णालयातील अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी मृत मुलांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख ऊपयांची भरपाई जाहीर केली आहे.

दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्य सचिवांच्या नेतृत्त्वात ही चौकशी होणार आहे. तसेच पोलीस आयुक्तांना जखमी मुलांना व त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारची मदत पुरविण्याचे व सहकार्य करण्याचे निर्देश उपराज्यपालांनी दिले आहेत.

दोषींना सोडणार नाही : मुख्यमंत्री

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेमागची कारणे तपासली जात असल्याचे सांगितले. तसेच या निष्काळजीपणाला जो कोणी जबाबदार असेल त्याला सोडले जाणार नाही, असेही स्पष्ट केले. दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही भविष्यात असा निष्काळजीपणा कोणी करणार नाही, अशी कारवाई आम्ही दोषींवर करू, असे स्पष्ट केले.

कृष्णानगरमध्येही आगीची दुर्घटना, तिघांचा मृत्यू

बाल रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेला तीन तास उलटल्यानंतर शाहदरा परिसरातील कृष्णानगर येथील एका निवासी इमारतीला आग लागली. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. अग्निशमन दलाने 10 जणांना वाचवले आहे. यापैकी 3 जण भाजल्याने जखमी झाले आहेत. रात्री 2.35 वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली. इंडियन बँकेजवळील गल्ली क्रमांक 1 येथील इमारतीत ही आग लागली होती.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article