For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शॉर्टसर्किटने आग, 85 लाखांचे नुकसान

11:08 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
शॉर्टसर्किटने आग  85 लाखांचे नुकसान
Advertisement

शिरगुप्पीतील घटना : गॅरेजमधील साहित्य, वाहने, खते आगीच्या भक्ष्यस्थानी

Advertisement

कागवाड : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत गॅरेजमधील सर्व साहित्य, नजीक पार्क केलेल्या दोन कार, खतविक्री केंद्राच्या दुकानातील खते आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी शिरगुप्पी (ता. कागवाड) येथे घडली. या दुर्घटनेत गॅरेजमधील साहित्य व कारचे मिळून 45 लाख तर खताच्या दुकानातील 40 लाखांचे साहित्य खाक झाले. शिरगुप्पी येथील शिवशक्ती  गॅरेजमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे आग लागल्याचे समोर येताच गॅरेजचे मालक अनिल माळी व युवकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत टायर्स, ऑईल, टायर फिटिंग मशीन आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. दरम्यान, चिकोडी, उगार व रायबाग येथील अग्निशमन दलांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानुसार जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

तोपर्यंत सुमारे 45 लाख रुपयांचे साहित्य खाक झाले होते. सदर गॅरेजनजीकच्या जीवन  अॅग्रो या शेती औषध व खताच्या दुकानाला आगीची झळ बसली. त्यात दुकानातील किमती खते व रसायने बंद बाटलीतून गायब झाल्याचे समोर आले. त्यात सुमारे 17 लाख रुपये किमतीचे खत, 5 लाख रुपये किमतीचे औषध, 15 लाख रुपये किमतीच्या पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले असल्याची माहिती खत दुकानाचे मालक सोपान लाटवडे यांनी दिली. सदर दोन्ही दुकान मालकांनी कर्जाऊ रक्कम घेऊन व्यवसाय सुरु केला होता. त्याचे कर्ज अद्यापही फिटलेले नसताना सदर दुर्घटना घडल्याने सरकारने घटनेची दखल घेत आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. कागवाड पोलीस स्थानकाचे साहाय्यक उपनिरीक्षक एस. आर. राजकनवर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. सदर दुर्घटनेला हेस्कॉम जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. गेल्या चार-पाच वर्षांपासून शिरगुप्पी परिसरात शॉर्टसर्किटने अनेकांचे नुकसान झाले आहे. त्याची गांभीर्याने दखल घेत उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात येत होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.