महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मध्य प्रदेशात बसला आग, 13 जणांचा होरपळून मृत्यू

07:00 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Madhya Pradesh, 13 people died
Advertisement

डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवणार :  16 जण गंभीर जखमी

Advertisement

वृत्तसंस्था /गुना

Advertisement

मध्य प्रदेशातील गुना येथे बुधवारी रात्री उशिराने डंपरला धडकल्यानंतर एका प्रवासी बसला आग लागली. या अपघातात 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 11 मृतदेह बसच्या आत सापडले असून दोन मृतदेह बसबाहेर सापडले. मात्र, मृतांची ओळख पटलेली नसल्याने आता डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवली जाणार आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त बस फिटनेस आणि इन्शुरन्सशिवाय सेवेत असल्यामुळे ‘आरटीओं’सह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाई करण्यात आली आहे. गुनाहून आरोनकडे जाणाऱ्या सिकरवार बसला बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास डंपरने धडक दिली. यानंतर डिझेलची टाकी फुटून बसला आग लागली, यात 13 प्रवासी जिवंत जळाले, तर 16 जण गंभीर जखमी झाले. अपघातप्रसंगी बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. त्यापैकी सुमारे 16 जण होरपळले असून त्यांना जिल्हा ऊग्णालयात दाखल करण्यात आल्याचे गुनाचे एसपी विजय कुमार खत्री यांनी सांगितले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातग्रस्त बसचे मालक भानू प्रताप हे कंत्राटदार असून भाजप नेते विश्वनाथ सिकरवार यांचे धाकटे भाऊ आहेत. विश्वनाथ हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. बस अपघाताच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दिले आहेत. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेण्यास परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख ऊपये आणि जखमींना 50 हजार ऊपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चौकशीचे आदेश अन् निलंबन कारवाई

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी शोक व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले. याचदरम्यान, गुना बस अपघातप्रकरणी मध्य प्रदेश सरकारने मोठी कारवाई करताना जिल्हाधिकारी तऊण राठी आणि पोलीस अधीक्षक विजय कुमार खत्री तसेच परिवहन आयुक्त संजय कुमार झा यांना हटवण्यात आले आहे. आरटीओ रवी बरेलिया यांनाही निलंबित करण्यात आले आहे. अग्निशमन दल उशिरा पोहोचल्याने सीएमओ (मुख्य पालिका अधिकारी) बी. डी. कट्रोलिया यांनाही निलंबित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस विमा आणि फिटनेसशिवाय धावत होती. बसचा फिटनेस कालावधी 17 फेब्रुवारी 2022 रोजी संपला असून विमा कालावधी 30 एप्रिल 2021 रोजी संपला आहे. परिवहन विभाग आणि जबाबदार व्यक्तींच्या दुर्लक्षामुळे या बसची नियमित तपासणी झालेली नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

नेहमीप्रमाणे 32 आसनी सिकरवार बस बुधवारी रात्री 8 च्या सुमारास गुना येथून आरोनसाठी निघाली होती. बस जिल्हा मुख्यालयापासून सात किमी अंतरावर असलेल्या घूम भागात पोहोचली असताना समोरून येणाऱ्या डंपरने धडक दिली. यानंतर बस पलटी होऊन आग लागली. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी तऊण राठी आणि पोलीस अधीक्षक विजय खत्री यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना ऊग्णवाहिका व इतर वाहनांनी जिल्हा ऊग्णालयात नेले. अंधारामुळे बचावकार्यात विलंब झाला होता.

काहीजण जीव वाचविण्यात सफल

डिझेलमुळे आग भडकल्यामुळे बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी कोणीही पुढे जाऊ शकले नाही. बस ज्या मार्गावरून जात होती तो निर्जन भाग होता. बस थांबल्यावर काही प्रवासी बाहेर आले आणि त्यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. काही प्रवाशांनी बसचे दरवाजे, खिडकीतून उड्या मारून आपला जीव वाचवला. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना उपचारासाठी जिल्हा ऊग्णालयात नेण्यात आले. बसला आग लागल्यानंतर समोरच्या आणि मधल्या सीटवर बसलेले काही प्रवासीच बाहेर येऊ शकले. बसच्या मागच्या बाजूला बसलेले लोक होरपळून जागीच मृत्युमुखी पडले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article