कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मजगाव येथे गवतगंजीला आग

11:14 AM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/मजगाव 

Advertisement

मजगाव येथे गवतगंजीला आग लागून सुमारे 25 हजाराचे गवत जळून खाक झाले आहे. मारुती गल्ली, मजगाव येथे शुक्रवारी ही घटना घडली. शेतकरी मल्लाप्पा ओमाण्णा काकतकर यांच्या राहत्या घराच्या परसातील गवतगंजीने शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान अचानक पेट घेतली. आगीचे व धुराचे लोळ उठल्याने काही काळा भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग लागलेली सदर जागा अडणीची असल्याने गावातील तरुणांनी गावातील पाण्याचा टँकर मागवून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु गवतगंजीने तीव्र पेट घेतल्याने त्यावर नियंत्रण आणणे कठीण होत होते. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. सदर पाण्याचा बंब उशिरा आल्याने सुमारे 3 ट्रॉली गवत जळून खाक झाले. रात्री 8 च्या दरम्यान आग विझविण्यात अग्निशमन जवानांना यश आले. या घटनेत शेतकऱ्याचे 25 हजाराचे नुकसान झाले. यावेळी उद्यमबाग पोलीस स्टेशनचे हवालदार पुजारी घटनास्थळी परिस्थिती हाताळत होते. यावेळी गावातील युवकांनीही आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शेतकऱ्याला प्रशासनातर्फे नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article