For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजाराम साखर कारखान्याला लागली आग

11:47 AM Feb 28, 2025 IST | Pooja Marathe
राजाराम साखर कारखान्याला लागली आग
Advertisement

कोल्हापूर
कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याला आग लागली आहे. काही वेळापूर्वी लागलेल्या आगीन रौद्ररूपं धारण केलं. हंगाम संपल्यानंतर कारखान्यातील मशीन्सची साफसफाई करताना आग लागली. कारखान्यात खाली पडलेल्या ऑइलला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिकांनी घटनास्थळी पाहणी केली. अग्निशमन विभागाकडून शर्तीचे प्रयत्नांती आग विझवण्यात यश आले आहे.कारखान्यात मेंटेनन्सची काम सुरु होती. यादरम्यान एका ठिकाणी ऑईल सांडलेले होते. शॉर्ट सर्कीट झाल्याने आग लागली आहे. आग लागल्यावर ताबडतोब अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यामुळे कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली आहे. वायरिंग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली अशी माहिती आमदार अमल महाडिक यांनी यावेळी दिली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.