गुजरात-वलसाड येथे केमिकल कंपनीत आग
06:34 AM Dec 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ गांधीनगर
Advertisement
गुजरातमधील वलसाड जिह्यातील उमरगाम तालुक्यात शुक्रवारी दुपारी एका केमिकल कंपनीत भीषण आग लागली. या अग्नितांडवादरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना वेळीच सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी दुर्घटना घडलेली कंपनी मोठ्या प्रमाणात रसायने साठवत असल्यामुळे करोडोंचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नव्हते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आग विझवण्यासाठी दाखल झाल्या होत्या. कंपन्यांमध्ये रासायनिक पदार्थ आणि द्रव्यांमुळे आगीचा भडका तीव्र झाल्याचे दिसून येत होते. आगीच्या मोठ्या ज्वाळांमुळे अग्निशमन दलाने परिसरात इशारा जारी करत लोकांना अलर्ट केले होते. मोठ्या आगीमुळे जवळच्या भागातून इतर अग्निशमन दलांचे बंबही मागविण्यात आले होते.
Advertisement
Advertisement