For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंडणगडात संगणक दुकानास आग

11:38 AM Aug 02, 2025 IST | Radhika Patil
मंडणगडात संगणक दुकानास आग
Advertisement

मंडणगड :

Advertisement

शहरातील बाणकोट रोड येथे भर बाजारपेठेत असलेल्या अमित कॉम्प्युटर्स या संगणक दुरुस्तीच्या दुकानात शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. परिसरातील दाटीवाटीने अनेक दुकाने असल्याने नागरिक व नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने अनर्थ टळला. शार्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दुकानाचे मालक अमित गुजर सकाळी नेहमीप्रमाणे दुकानात येऊन दिवाबत्ती करुन दुकान बंद करुन कामास निघून गेले. काही वेळाने दुकानातून धूर येत असल्याचे जवळच्या दुकानदारांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी अमित गुजर यांना तातडीने दुकानात येण्यासाठी सांगीतले. तेही बाजारातच असल्याने तातडीने दुकानाजवळ आले. यानंतर आग लागल्याचे लक्षात येताच नगरपंचायतीला कळवण्यात आले. यामुळे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार व सर्व कर्मचारी नगरपंचायतीकडे उपलब्ध अग्नीशमन बुलेट यंत्रणेसह घटनास्थळी दाखल झाले.

Advertisement

परिसरातील नागरिक व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी तातडीने दुकानाचा दरवाजा उघडून आग आटोक्यात आणण्याचे कामास सुरु केले. दुकानातील सामान सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेसह परिसरातून पाणी आणून आटोक्यात आणण्यात आली.

या परिसरात दाटीवाटीने अनेक दुकाने आहेत. मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनी दुकानातील शार्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. तसेच संबंधित यंत्रणेस पंचनामा करण्यास सूचित करण्यात आले आहे. दुकानाचे मालक अमित गुजर यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Advertisement
Tags :

.