भंगार अड्ड्याला आग, सहा गोदामे खाक
11:23 AM Nov 20, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
विशेष म्हणजे हा भंगार अड्डा सांकवाळ औद्योगिक वसाहतीच्या जमिनीवरच आहे. मिळालेल्या माहितीनुसार भंगार अड्ड्यामध्ये आग भडकण्याची घटना पहाटे अडिचच्या सुमारास उघडकीस आली. या अड्ड्यामध्येच राहणाऱ्या कामगारांना आग भडकल्याचे दिसून येताच त्यांनी मालकाला माहिती दिली. त्यानंतर वेर्णातील शासकीय अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्याला सुरवात केली. आग मोठ्या प्रमाणात भडकू लागल्याने वास्कोतील अग्निशामक दलाला तसेच मडगावच्या व पणजीच्या दलालाही पाचारण करण्यात आले. पारादीप फॉसफेट, गोवा शिपयार्ड व एमपीएचा बंबही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्यात भाग घेतला. या भंगार अड्ड्यात लोखंडी पत्र्यांबरोबरच मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साहित्य तसेच बॅरल्स व इतर साहित्य होते. प्लास्टिकच्या साहित्यामुळे आग अधिकच भडकली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाने सकाळी उशिरापर्यंत कष्ट घेतले. विशेष म्हणजे हा भंगार अड्डा सांकवाळ औद्योगिक वसाहतीत आहे. जवळपास काही घरेही आहेत. औद्यााsगिक वसाहतीतील इतर उद्योगांपर्यंत तसेच त्या घरांपर्यंत आग पसरू नये यासाठी अग्निशामक दलाने घेतलेले कष्ट यशस्वी ठरले. परंतु भंगार अड्ड्यातील एकूण सहा गोदाम खाक झाले. या आगीच्या घटनेमुळे त्या परिसरात भिती पसरली होती.
Advertisement
झुवारीनगर झरीन येथील दुर्घटना
Advertisement
वास्को : झुआरीनगर झरीन भागातील भल्या मोठ्या भंगार अड्ड्याला बुधवारी पहाटे आग लागण्याची घटना घडली. या आगीत त्या भंगार अड्ड्यातील सहा गोदाम खाक झाले. सकाळपर्यंत अग्निशामक बंबांनी ही आग विझविण्यासाठी कष्ट घेतले. परंतु संध्याकाळपर्यंत त्या परिसरात धूर पसरत होता. सदर भंगार अड्ड्यात शॉटसर्किट होऊन आग लागली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Advertisement
Advertisement
Next Article