महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संकेश्वरात गॅरेज-ऑटोमोबाईल दुकानाला आग

11:11 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

27 लाखांचे नुकसान : 9 दुचाकी, ऑटोमोबाईल स्पेअरपार्टसह खाक : विद्युतखांब कारणीभूत?

Advertisement

संकेश्वर : सोमवारी रात्री शॉर्टसर्किटने भीषण आग लागून गॅरेजसह ऑटोमोबाईल साहित्य जळून खाक झाले. या आगीत 9 दुचाकांसह गॅरेजमधील सर्व साहित्य व ऑईल जळाले. या दुर्घटनेत 27 लाख ऊपयांचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरा अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. या घटनेचा मंगळवारी महसूल खात्याने पंचनामा केला आहे. महांतेश शंकर मलकट्टी व रामा बाळू सुतार रा. संकेश्वर अशी नुकसानग्रस्तांची नावे आहेत या घटनेसंदर्भात समजलेली माहिती अशी, मलकट्टी ऑटोमोबाईल व ज्योतिर्लिंग गॅरेजचे दुकानदार नेहमीप्रमाणे दुकाने बंद करून घरी गेले होते. रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास गॅरेजमधून धूर येऊ लागला व काही क्षणातच आगीचा भडका उडाला. या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दल येईपर्यंत आगीने संपूर्ण गॅरेज आणि ऑटोमोबाईल दुकानाला घेरले. या आगीत 9 दुचाकी आणि सर्व साहित्य जळून खाक झाले. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.

Advertisement

मलकट्टी ऑटोमोबाईल शॉपमध्ये चारचाकी वाहनांना लागणारे सर्व प्रकारचे स्पेअरपार्ट व ऑईलचा साठा होता. तर ज्योतिर्लिंग दुचाकी गॅरेजमध्ये दुचाकीला लागणारे सर्व तऱ्हेचे साहित्य व दुऊस्तीसाठी आलेल्या स्प्लेंडर-3, शाईन-1, टीव्हीएस एक्सल-2, पल्सर-1 व स्कूटी-2 अशा 9 दुचाकी होत्या. ऑईल व टायरमुळे आग अधिकच भडकली गेल्याने सर्व साहित्य या आगीत खाक झाले. या आगीत ऑटोमोबाईल दुकानाचे 15 लाखाचे नुकसान झाले असल्याचे महांतेश मलकट्टी यांनी सांगितले. तर ज्योतिर्लिंग दुचाकी गॅरेजचे 12 लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती रामा सुतार यांनी दिली. गत चार वर्षांपूर्वीच महांतेश मलकट्टी व रामा सुतार या दोघा तऊणांनी नव्याने हा व्यवसाय उभा कऊन उदरनिर्वाहाचे साधन म्हणून सुऊवात केली होती. अलिकडील वर्षभरात या व्यवसायात जम बसला होता. मात्र सोमवारी रात्री शॉर्टसर्किटने आग लागल्याने सर्व होत्याचे नव्हते झाले. 4 वर्षापूर्वी गायकवाड व्यापारी संकुल हे नव्याने उभारण्यात आले आहे. व्यापारी संकुलातील विजेची जोडणी दर्जेदार करण्यात आली आहे. असे असताना शॉर्टसर्किट कसे झाले असा सवाल घटनास्थळी उपस्थित होत आहे. दरम्यान व्यापारी संकुलाच्या अगदी नजीक विद्युत खांब उभारण्यात आला असून या खांबामुळे ठिणगी पडून आग लागली असावी अशी चर्चा घटनास्थळी सुरु होती. या व्यावसायिकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांतून करण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article