प्रेम प्रकरणातून भांडणाऱ्या तीन तरुणांवर एफआयआर
12:31 PM Sep 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : प्रेम प्रकरणातून एकमेकांबरोबर भांडण काढणाऱ्या न्यू गांधीनगर व अमननगर येथील तीन तरुणांवर खबरदारीची उपाययोजना म्हणून माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तोहिद ताजुद्दीन मुल्ला (वय 19) राहणार न्यू गांधीनगर, सोहेल अब्दुलहुसेन शेख (वय 22), बाशा नूरअहमद सय्यद (वय 35) दोघेही राहणार अमननगर अशी त्यांची नावे आहेत. तोहिदचे काकती येथील एका तरुणीवर प्रेम होते. त्याच तरुणीवर सोहेलचेही प्रेम बसले. याच मुद्द्यावर रविवारी 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी अमननगर येथे सोहेलने आपल्यासोबत बाशाला घेऊन तोहिदबरोबर भांडण काढले. त्यामुळे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी या तिन्ही तरुणांवर खबरदारीच्या उपाययोजनेंतर्गत एफआयआर दाखल केले आहेत.
Advertisement
Advertisement