For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फिनटेक फर्म ‘पेयू’ ला पेमेंटसाठी मिळाली परवानगी

06:43 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
फिनटेक फर्म ‘पेयू’ ला पेमेंटसाठी मिळाली परवानगी
Advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हिरवा कंदील

Advertisement

बेंगळूर :

फिनटेक फर्म पेयू ला पेमेंट अॅग्रीगेटर म्हणून काम करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. या परवानगी नंतर पेयूला पेमेंट प्रणाली राबवण्यासोबतच नव्या व्यापाऱ्यांना जोडता येणार आहे.

Advertisement

जानेवारी 2023 मध्ये बँकिंग नियामकाने काही कारणास्तव  पेमेंट अॅग्रीगेटरसंबंधीचा अर्ज मागे घेण्यास पेयूला सांगितला होता. पेमेंट अॅग्रीगेटरसाठी नियामकाने कंपनीला पुन्हा नव्याने अर्ज करण्याची सूचना केली होती. यानंतर पेयूला व्यवसायाकरता नव्या व्यापाऱ्यांची जोडणी करणे थांबवावे लागले होते.

यांच्यावरही होते निर्बंध

या संदर्भातला प्रतिबंध हा याआधी पेटीएम, रेझर पे आणि कॅश फ्री यासारख्या कंपन्यांवरही लादला गेला होता. यामध्ये रेझर पे आणि कॅश फ्री यांना मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये मंजुरी मिळाली आहे.  पेमेंट अॅग्रीगेटरच्या माध्यमातून ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना पेमेंटची सुविधा दिली जाते. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, कार्डलेस इएमआय, बँक ट्रान्स्फर आणि इ वॉलेटसारख्या सेवांचा याअंतर्गत उपभोग घेता येतो.

 पेयूने कमावले 1575 कोटी

2023-24 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये कंपनीने 1757 कोटी रुपयांची कमाई केली असल्याची माहिती आहे. पेमेंट व्यवसायामध्ये पंधरा टक्के वाढ नोंदवली आहे.

Advertisement
Tags :

.