कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फिनलंडमध्ये 2 हजार टन वाळूद्वारे बॅटरी निर्माण

06:45 AM Aug 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्रीन एनर्जीचे उत्कृष्ट उदाहरण

Advertisement

फिनलंडने अनोख्या तंत्रज्ञानाद्वारे जगाला चकित केले आहे. आता वाळूद्वारे देखील बॅटरी तयार केली जाऊ शकते. ही काही साधारण बॅटरी नव्हे तर 13 मीटर उंच टॉवर असून यात 2 हजार टन वाळू वाळू भरलेली आहे. हे तंत्रज्ञान केवळ स्वस्त नसून पर्यावरणासाठी देखील उपयुक्त आहे. जर हे यशस्वी ठरले तर जगभरात ऊर्जा क्रांति घडवून आणू शकते. लिथियम बॅटरीची जागा वाळू बॅटरी घेऊ शकते.

Advertisement

फिनलंडची ही नवी बॅटरी पारंपरिक लिथियम बॅटरीपेक्षा अत्यंत वेगळी आहे. यात वाळूला ऊर्जा संग्रहित करण्यासाठी वापरण्यात येते. वारा आणि सूर्यकिरणांद्वारे अधिक वीज निर्माण होते, तेव्हा त्या अतिरिक्त ऊर्जेला वाळूत संग्रहित केले जाते. या प्रक्रियेत वाळूला 600 अंश सेल्सिअसपर्यंत तप्त केले जाते. ही उष्णता वाळूत महिन्यांपर्यंत सुरक्षित राहते, उष्णतेलाच संग्रहित करून ठेवले जाते. गरज भासल्यास या उष्णतेला बाहेर काढत घर किंवा उद्योगांना उष्णता देण्यासाठी वापरली जाऊ शकते.

स्वस्त अन् टिकावू तंत्रज्ञान

या बॅटरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे हे अत्यंत स्वस्त आहे. याकरता महागडे लिथियम किंवा जटिल उपकरणांची गरज भासत नाही. वाळू स्वस्त आणि सहजपणे मिळणारा पदार्थ आहे. जो टॉवरमध्ये भरून वापरण्यात येतो. हे तंत्रज्ञान दीर्घकाळापर्यंत चालणार आहे. ही बॅटरी तुमचा फोन किंवा त्यापुढील वर्जनपेक्षाही अधिक काळापर्यंत काम करू शकते, यातून हे पर्यावरणासाठी देखील सुरक्षित आण टिकावू असल्याचे कळते, असे संबंधित कंपनीचे सांगणे आहे.

पर्यावरणासाठी लाभ

फिनलंडचे हे तंत्रज्ञान उष्णतेला संग्रहित करून ऊर्जेचा उत्तम वापर करण्यास मदत करते. हिवाळ्यात जेव्हा वारा अन् सूर्यकिरणांच्या ऊर्जेची कमतरता असते, तेव्हा वाळूतून उष्णता बाहेर काढत घरांना उबदार ठेवता येणार आहे. यामुळे कोळसा किंवा तेलासारखे प्रदूषण फैलावणाऱ्या इंधनाची गरज कमी भासणार आहे. हे पाऊल फिनलंडच्या 2035 पर्यंत क्लायमेट-न्युट्रॅलिटीचे लक्ष्य गाठण्यास मदत करणार आहे.

कशाप्रकारे निर्मिती?

हा टॉवर पोर्नाइनेन या छोट्या शहरात उभारण्यात आला असून यात 2 हजार टन वाळू भरण्यात आली आहे. ही वाळू सोपस्टोनद्वारे तयार झालेली आहे. या वाळूला गरम करण्यासाठी नुतनीकरणीय ऊर्जेचा वापर होतो. टॉवरला खास प्रकारे निर्माण करत उष्णता बाहेर पडू नये आणि दीर्घकाळापर्यंत कायम रहावी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हा प्रकल्प फिनलंडची कंपनी पोलर नाइट एनर्जीने तयार केला आहे.

भविष्यात काय घडणार?

ही वाळू बॅटरी सहज तयार करता येणार असल्याने जगभरात याचा वापर होऊ शकतो. थंडीचे प्रदेश असलेल्या भागांमध्ये ही उपयुक्त ठरू शकते. या तंत्रज्ञानाला अधिक प्रगत करत वीजनिर्मितीही करता येऊ शकते. जर हे यशस्वी ठरले तर पारंपरिक बॅटरीला बदलू शकते आणि नुतनीकरणीय ऊर्जेला लोकप्रिय करू शकते असे तज्ञांचे मानणे आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article