महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्राचीन काळात हाताची बोटं कापण्याची होती प्रथा

06:43 AM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्ययनात झाले चकित करणार खुलासे

Advertisement

सद्यकाळात बॉडी मॉडिफिकेशन हा प्रकार तुलनेत फारसा नवा नाही. लोक वेगळे दिसण्याच्या इच्छेपोटी बॉडी मॉडिफिकेशन करवून घेत असतात. काही लोकांनी तर शरीराच्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक हिस्स्याला टॅटूंनी व्यापून टाकले आहे. अशाप्रकारचे निर्णय घेणाऱ्या लोकांना वेडे देखील ठरविले जाते, परंतु आता एक अध्ययनात झालेला खुलासा अत्यंत दंग करणारा आहे. लोक प्राचीन काळात देखील एकप्रकारे बॉडी मॉडिफिकेशन करवित होते असे यात आढळून आले आहे.

Advertisement

पश्चिम युरोपमध्ये पुरापाषाण युगातील पुरुष आणि महिलांनी धार्मिक विधीचा भाग म्हणून स्वत:ची बोटं कापून घेतली होती अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. तसेच यासंबंधीचे पुरावे असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. गुहांमध्ये अशी शेकडो चित्रे मिळाली आहेत, ज्यात हातांमधील किमान एक हिस्स गायब दाखविण्यात आला आहे.

या लोकांनी देवतांकडून मदत मिळविण्याच्या इच्छेपोटी जाणूनबुजून विधी अंतर्गत स्वत:ची बोटं कापून घेतल्याचे ठोस पुरावे आहेत असे कॅनडाच्या व्हँकुव्हरमधील सायमन फ्रेजर युनिव्हर्सिटीचे पुरातत्व तज्ञ मार्क कोलार्ड यांनी सांगितले आहे. युरोपियन सोसायटी फॉर ह्यूमन इव्होल्युशनमध्ये स्वत:च्या या अध्ययनाचा दस्तऐवज कोलार्ड यांनी अलिकडेच सादर केला असून यात फ्रान्स आणि स्पेनमध्ये 25000 वर्षे जुन्या हाताने रेखाटण्यात आलेल्या चित्रांचा उल्लेख आहे. 200 प्रिंट्सपैकी प्रत्येकात किमान एक बोट गायब होते. काहींमध्ये केवळ वरचा हिस्सा गायब दिसला, तर काहींमध्ये अनेक बोटंच गायब होती.

देवतांना खूश करण्यासाठी लोक जाणूनबुजून स्वत:च्या शरीराचे अवयव कापत होते असे या अध्ययनात म्हटले गेले आहे. कोलार्ड आणि त्यांची पीएचडी स्टुडंट ब्रे मॅककॉलीने अन्य हातांनी तयार करण्यात आलेल्या चित्रांच्या माध्यमातून हा प्रकार अनेक प्राचीन समाजांमध्येही  घडायचा असे सांगितले. प्राचीन काळात हे घडायचे आणि आजही घडते. न्यू गिनी हायलँड्सच्या महिला आजही कुणा स्वकीयाच्या मृत्यूचा संकेत म्हणून स्वत:ची बोटं कापून घेतात असे त्यांनी म्हटले आहे.

पुरापाषाण काळात युरोपीय लोक देखील हेच करत होते असे आमचे मानणे आहे. परंतु असे करण्यामागील त्यांचे कारण वेगळे असू शकते. ही एक अशी प्रथा आहे, जिचे नियमित स्वरुपात पालन झालेले नाही, तर इतिहासात विविध काळात घडले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article