For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जखमी कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

11:16 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
जखमी कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
Advertisement

लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून कामगारांना धीर

Advertisement

बेळगाव : नावगे येथील कारखान्यातील आग दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आर्थिक मदत केली आहे. या दुर्घटनेसंबंधी त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबीयाची भेट घेऊन लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सून डॉ. हिता मृणाल हेब्बाळकर यांनी त्यांचे सांत्वन केले. मृत तरुणाच्या कुटुंबीयांशी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी फोनवरून संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले आहे. त्याच्या कुटुंबीयांनाही भरपाई देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. लक्ष्मी हेब्बाळकर बेंगळूरला आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या सून डॉ. हिता यांनी इस्पितळाला भेट देऊन जखमी कामगारांची विचारपूस करण्याबरोबरच लक्ष्मीताई फौंडेशनच्यावतीने त्यांना आर्थिक मदतही केली.

Advertisement
Advertisement
Tags :

.