नाथ पै सर्कल येथील गटारीची अखेर दुरुस्ती
11:37 AM Jan 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कल दरम्यानच्या गटारीची अखेर स्मार्टसिटीच्यावतीने सोमवार दि. 6 रोजी दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. नगरसेवक रवी साळुंखे यांनी दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला. गेल्या काही दिवसांपासून नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कल दरम्यानच्या गटारीतून सांडपाणी बाहेर पडत होते. त्यामुळे परिसरात सांडपाणी पसरून दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे गटारींची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांतून केली जात होती. पण याकडे स्मार्टसिटी आणि मनपाने दुर्लक्ष केले होते. नगरसेवक रवी साळुंखे यांनी पुढाकार घेत आजअखेर स्मार्टसिटीच्या कर्मचाऱ्यांना गटारीची दुरुस्ती करण्यास भाग पाडले. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
Advertisement
Advertisement