अनगोळ रघुनाथ पेठ येथील रस्त्याचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते
बेळगाव : अनगोळ रघुनाथ पेठ येथील रस्त्याचे भूमीपूजन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौक ते रघुनाथ पेठ हनुमान मंदिरपर्यंत ड्रेनेज लाईन घालण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर मोठा प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवणे धोकादायक ठरत होते. त्यामुळे वाहन चालक व नागरिक या रस्त्यामुळे त्रस्त झाले होते. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि भागातील नगरसेविका खुर्शीद मुल्ला यांच्या उपस्थितीत रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले. नगरसेविका खुर्शीद मुल्ला, नदीम मुल्ला, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, शंकर तेली, शिवा तेली, जावेद धामणेकर, रमीझ घोरी, असीफ जहागीरदार, ताहीर सय्यद, अश्फाक गुजराती, मलीक बागवान, शोयेब मुजावर तसेच गल्लीतील पंच, नागरिक व महिला मोठा संख्येने उपस्थित होत्या.