अखेर गांधीनगर सेवा रस्त्याचे डांबरीकरण
स्थानिक रहिवाशांसह वाहनधारकांतून समाधान
प्रतिनिधी/ बेळगाव
‘गांधीनगर ब्रिजजवळ सेवा रस्त्याची चाळण’ या मथळ्याखाली शनिवार दि. 20 रोजीच्या अंकात ‘तरुण भारत’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध करताच त्याची प्रशासनाने दखल घेऊन रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकातून समाधान व्यक्त केले जात आहे.
गांधीनगर ब्रिज ते सांबऱ्याकडे जाणाऱ्या सेवा रस्त्याची अक्षरश: चाळण झाली होती. पावसामुळे ठिकठिकाणी मोठे ख•s पडल्याने ख•dयातून वाट शोधताना वाहनचालकांची दमछाक होत होती. पावसाचे पाणी ख•dयात भरत असल्याने ख•dयांचा अंदाज येणे अवघड झाले होते. त्यामुळे वारंवार लहानमोठ्या अपघातांची मालिका सुरूच होती. इतकेच नव्हे तर वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाणही वाढले होते.
या मार्गावरून गांधीनगरकडे जाणाऱ्या त्याचबरोबर सांबरासह बागलकोटकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे दररोज हजारो वाहनांची ये-जा या मार्गावरून असते. अवजड वाहनेदेखील मोठ्या संख्येने प्रवास करत असतात. ख•dयातून वाहने पुढे नेण्यास विलंब लागत असल्याने वाहतूक कोंडीदेखील होत होती. त्यामुळे याचा ताण वाहतूक पोलिसांवर पडत होता. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करावी किंवा डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, याकडे महापालिका तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केले होते. याबाबत ‘तरुण भारत’ने बातमी प्रसिद्ध करताच खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने वृत्त प्रसिद्ध झाले त्याच दिवशी ख•s पडलेल्या रस्त्यावर खडी व चिपिंगचा भराव टाकून लेव्हलिंग केले. यानंतर रविवारी डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.