कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अखेर शहरातील गँट्रीज-कँटीलियर्सचा महानगरपालिकेकडून ताबा

11:37 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रकरणावर अखेर पडदा

Advertisement

बेळगाव : गेल्या सहा महिन्यांपासून गाजत असलेले शहरातील 24 गँट्रीज आणि कँटिलियर जाहिराती अखेर महापालिकेकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्यांचा कब्जा घेण्यात आल्यानंतर त्यावरील जाहिराती हटविण्यात आल्या. त्यावर आता महापालिकेच्या जाहिराती लावल्या जाणार आहेत. शहरातील गँट्रीज व कँटिलियर्सच्या ठेक्यावरून गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेत घमासान सुरू आहे. जाहिरात ठेकेदाराकडून महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्याचबरोबर त्याचा ठेका संपला असतानादेखील महापालिकेकडून ताबा का घेतला जात नाही? यावरून सर्वसाधारण बैठकांमध्ये नगरसेवक व लोकप्रतिनिधी मनपा अधिकाऱ्यांना धारेवर धरत होते.

Advertisement

शनिवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत गँट्रीज व कँटिलियर्सच्या ठेक्यावरून तब्बल अडीच तास चर्चा झाली होती. हा ठेका महापालिकेने कबाडी नामक ठेकेदाराला दिला होता. नियमांचे उल्लंघन झाल्याने ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये घालण्याचा निर्णयही बैठकीत झाला होता. ठेक्याची मुदत मंगळवार दि. 6 रोजी पूर्ण झाली. त्याचदिवशी त्या ठिकाणच्या जाहिराती हटविण्याचा व गँट्रीज-कँटीलियर्सचा कब्जा घेण्याचा आदेश महापौर मंगेश पवार यांनी बैठकीत बजावला होता. कोणत्याही परिस्थितीत मंगळवार दि. 6 रोजी गँट्रीज व कँटिलियर्सचा कब्जा घेतलाच पाहिजे, अशी मागणी सभागृहात लावून धरली होती. महसूल विभागाने मंगळवारी रात्री 11 च्या दरम्यान शहरातील उत्तर व दक्षिण भागात असलेल्या 24 गँट्रीज व कँटीलियर्सचा कब्जा घेतला आहे. त्यावर आता  जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article