For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

...अखेर कॅन्टोन्मेंटनेही वाढविले कर

11:45 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
   अखेर कॅन्टोन्मेंटनेही वाढविले कर
Advertisement

15 जुलैपासून अंमलबजावणी : 5 ते 10 टक्क्यांनी वाढ

Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डकडून दिल्या जाणाऱ्या विविध सेवांमध्ये 5 ते 10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 15 जुलैपासून वाढीव कर आकारला जात आहे. कागदपत्रांसोबत व्यवसाय परवाना तसेच हॉस्पिटलमधील सेवांच्या दरात काही प्रमाणात वाढ करण्यात आल्याने कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांना आता या वाढीव कराचा सामना करावा लागणार आहे. महसुलात वाढ व्हावी, यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने काही सेवांच्या दरात वाढ केली. यापूर्वी धोबी घाटासाठी प्रतिमहिना 250 रुपये द्यावे लागत होते. त्या ठिकाणी आता 275 रुपये द्यावे लागणार आहेत. घराच्या उताऱ्यासाठी 125 ऐवजी 200 रुपये मोजावे लागणार आहेत. बिल्डींग प्लॅनसाठी आता 700 ऐवजी हजार रुपये मोजावे लागणार आहेत. तीन भाषेतील मतदारयादीसाठी 2 हजार 400 रुपये द्यावे लागणार आहेत. याबरोबरच कॅन्टोन्मेंट परिसरात बियर बार, वाईन शॉप यांच्याकडून कोणताही कर मिळत नव्हता. त्यामुळे यापुढील काळात 18 रुपये प्रति चौरस फूट दराने कर आकारणी केली जाणार आहे. आता रोड कटिंग करण्यासाठी 1500 रुपये कॅन्टोन्मेंटला द्यावे लागणार आहेत. याबरोबरच वैद्यकीय सेवांच्या दरात 4 ते 5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. साऊंड सिस्टीम व बँडसाठी पंधराशे रुपये, पेंडॉल डेकोरेशनसाठी पंधराशे रुपये मोजावे लागणार आहेत. याबरोबर इतर करांमध्येही वाढ करण्यात आली आहे.

तातडीने उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कागदपत्रांचे दर कमी

Advertisement

कॅन्टोन्मेंट बोर्डने करामध्ये मोठी वाढ केली होती. परंतु, कॅन्टोन्मेंटचे नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर यांनी विनंती करत काही कर कमी करण्याची मागणी बोर्ड मिटिंगमध्ये केली होती. याची दखल घेत तातडीने उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कागदपत्रांचे दर कमी करण्यात आले. याबरोबर इतर सेवांचे दरही 3 ते 4 टक्क्यांनी कमी करण्यात आले.

Advertisement
Tags :

.