महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अखेर अलतग्याच्या तरुणाचा मृतदेह हाती

12:09 PM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शनिवारी रात्री मार्कंडेय नदीमध्ये गेला होता वाहून :  मृतदेह बाहेर काढण्यासाठी तातडीने मदत 

Advertisement

बेळगाव : केशकर्तनासाठी जाताना नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. रविवारी दुपारी पोलीस, एनडीआरएफ व एचएआरएफच्या पथकाने नदीपात्रातून या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. शनिवारी रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास तो मार्कंडेय नदीत वाहून गेला होता. ओंकार अरुण पाटील (वय 24) रा. गणेशनगर, अलतगा असे त्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. सोमवार दि. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. रक्षाविसर्जन होणार आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. शनिवारी रात्री केए 22 ईए 3683 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून अलतग्याहून केशकर्तनासाठी कंग्राळी खुर्दला जाताना ओंकार व ज्योतिनाथ विलास पाटील (वय 24) हे दोघे मार्कंडेय नदीत वाहून गेले होते. घटनेची माहिती समजताच काकती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री मोटारसायकलचा शोध घेण्यात स्थानिक नागरिक व पथकांना यश आले.

Advertisement

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्वीय साहाय्यक मलगौडा पाटील हे पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून स्वत: रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने रात्री वाहून गेलेल्या तरुणासाठी शोध घेण्यात आला. ओंकारचा मित्र ज्योतिनाथ याने पोहून किनारा गाठला होता. मात्र, रात्री ओंकारचा शोध लागला नाही. रविवारी सकाळी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदी अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी दाखल होऊन शोधकार्यासाठी मार्गदर्शन केले. एनडीआरएफच्या पथकाबरोबरच बसवराज हिरेमठ यांच्या नेतृत्वाखालील हेल्पलाईन इमर्जन्सी रेस्क्यू फौंडेशनचे राजू टक्केकर, पद्मप्रसाद हुली, वैभव पाटील, संतोष दरेकर, राहुल पाटील, शैलेश पवार, यल्लाप्पा कांबळे, गजानन पाटील, ओंकार चौगुले, अविनाश पाटील, मोहन गोंधळी, रितेश चौगुले, अनंत पाटील आदी सामाजिक कार्यकर्त्यांनीही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article